नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेत अस्तान नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनींचे घवघवीत यश – आजचा महाराष्ट्र

हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेत अस्तान नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनींचे घवघवीत यश

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)राज्यस्तरीय स्काऊट गाईड अंतर्गत जिल्हा परिषद शाळा अस्तान नं. १ शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत कब व बुलबुल युनिट स्थापन केले असून या प्रशालेतील राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट मधील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी सन २०२१/२०२२मध्ये घेण्यात आलेल्या हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ठ

झाल्या होत्या. ही परीक्षा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी येथे दिनांक २८/०३/२०२२ ते ३०/०३/२०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. सदर परीक्षेमध्ये अस्तान नं .१ शाळेतील कु.गौरी संतोष चव्हाण, कु.साक्षी विजय सावंत, कु. प्राची राजेंद्र मोरे, कु.प्रणिता पांडुरंग आखाडे , कु. अनुष्का संतोष चव्हाण, कु. आर्या अनिल तांबे, कु. ऋतुजा मनोज तांबे, कु.सृष्टी कुंदन जाधव, कु . आसावी दत्ताराम मोरे, कु. संचीता दत्ताराम मोरे, कु.ज्योती जनार्दन आखाडे या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांनींना प्रशिक्षक व अस्तान नं. १ शाळेच्या शिक्षिका श्रीमती अर्चना पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांनींचे माजी जि. प. सदस्या दर्शना मोरे शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर शिर्के शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिशा तांबे शिक्षक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]