स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन रा.जी.प. शाळा. भागीरथीखार येथे आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी देशभक्ति पर गीते सादर करत जल्लोषात संपन्न
रायगड (रोहा प्रतिनीधी)-भारतीय स्वतंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ता. रोहा.जि रायगड शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील रा.जि.प. शाळा . भागिर्थीखार येथे विद्यार्थी पालक पदाधिकारी मान्यवर व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ . उज्ज्वला गोले यांच्या नियोजनातून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
ग्रुपग्राम पंचायत शेडसई चे सदस्य व भागिर्थीखार चे रहिवासी मा.श्री. तानाजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले .भारतीय तिरंगा झेंड्याला शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक पदाधिकारी ग्रामस्थ यांनी सन्मानपूर्वक सलामी दिली अमृत महोत्सव शासकीय आदेशा प्रमाणे .१३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण मा. सौ. मीनाक्षी देवचंद्र म्हात्रे १४ ऑगस्ट ध्वजारोहण माननीय सौ. श्री. कोळी १५ ऑगस्ट ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन माननीय श्री. तानाजी देवजी म्हात्रे या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत रा.जी.प. शाळा भागिर्थीखार येथे शिक्षक पालक पदाधिकारी कला कौशल, कौशल्यात्मक स्पर्धा, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे बहुविध उपक्रम शैक्षणिक वातावरणात राबविण्यात आले. 
आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रभात वेळी जनजागृती साठी संस्कारक्षम देशभक्तीवर घोषणा देऊन ढोल वादन करत प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. ध्वजारोहण सन्मानपूर्वक झाले. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हणून बक्षीस वितरण सोहळा केला गेला , विद्यार्थी मान्यवर शिक्षक यांची भाषणे होऊन अल्पोपाहार वाटप करून कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला. 
बक्षीस वितरण सोहळा ग्रामपंचायत सदस्य श्री तानाजी म्हात्रे, सौ. मीनाक्षी म्हात्रे यांच्या विद्यमाने संपन्न झाला. अल्पोपाहार देणारे दाते योगिता, हिरा हॉटेल, यशपाल हॉटेल, श्री. तानाजी म्हात्रे, श्री. दामोदर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य , श्री धर्माजी कोळी, श्री भरत म्हात्रे, माजी सदस्य श्री. विलास म्हात्रे, माजी सरपंच श्री संजय 
म्हात्रे, श्री. देवचंद म्हात्रे, आगरी कुभोशी ग्रुप अध्यक्ष श्री वामन पारंगे, सदर कार्यक्रमात श्री गणेश महादेव म्हात्रे मुंबईकर यांनी रायगड जिल्हा परिषद शाळेला संगणक संच देण्याचे जाहीर केले. समिती अध्यक्ष नंदा मंगेश कोळी,प्रणेशा म्हात्रे,अध्यक्ष सुजाता म्हात्रे, शालेय पोषण आहार अध्यक्षा पुनर्निता, कार्तिक म्हात्रे, श्री. ज्ञानेश्वर कोळी तसेच सर्व सदस्य शालेय समिती, प्रतिष्ठित ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षकवृंद अंगणवाडी सेविका ताई व मुंबईकर श्री गणेश म्हात्रे सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













