अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त व मा.श्री.आमदार रविन्द्रजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धाकेश्वर मित्र मंडळातर्फे रा. जी. प. शाळा देवकान्हे येथे शालोपयोगी वस्तूंचे वाटप
प्रतिनीधी,
रायगड (रोहा) गौरवशाली भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच मा.श्री. आमदार रविंद्रजी पाटिल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अमितजी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल खंडागळे युवा मोर्चा
तालुका उपाध्यक्ष ,अविनाश कणेकर युवा मोर्चा तालुका सरचिटणीस आणि धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांच्या मार्फत रा. जी. प .शाळा देवकान्हे येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे 
वाटप करण्यात आले.मुख्याध्यापक सचिन टिकुले ,दिनेश सुटे, उमाकांत जंगम, हाकेसर जं, शाळा कमिटी अध्यक्ष विश्वनाथ थिटे तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













