मंजुळेनगर पेठ येथे महिला बचतगट आणि रहिवासी यांचेतर्फे ध्वजारोहण करण्यात आले
रायगड {पनवेल प्रतिनीधी}- मंजुळेनगर पेठ याठिकाणी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम ढोल वादन करण्यात आले यामध्ये 
मोठ्या उत्साहाने नागरिक सहभागी झाले होते यावेळी सौ वनिता घोंगडे यांनी सर्व महीलांसहित कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मंजुळेनगरमधील महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि भटक्या विमुक्त जमातीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ निता मंजुळे ,सामाजिक कार्यकर्त्या आणि मधुरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. चित्रा देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीत आणि ध्वजगित मुलांच्या तर्फे सादर करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













