नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कर्मचारी, अलिबाग पोलिस निरीक्षक, ट्राफिक पोलीस, मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या विद्यमाने अलिबाग व पेण येथील स्थित नागरिक यांच्या सहकार्याने आझादी का अमृत महोत्सव घर घर तिरंगा या अभियानांतर्गत अलिबाग व पेण शहरात भव्य रॅली काढण्यात आली – आजचा महाराष्ट्र

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कर्मचारी, अलिबाग पोलिस निरीक्षक, ट्राफिक पोलीस, मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या विद्यमाने अलिबाग व पेण येथील स्थित नागरिक यांच्या सहकार्याने आझादी का अमृत महोत्सव घर घर तिरंगा या अभियानांतर्गत अलिबाग व पेण शहरात भव्य रॅली काढण्यात आली

रायगड {पेण प्रतिनीधी}:-भारत सरकारने भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हे अभियान राबवण्याचे ठरविले आहे या अभियानांतर्गत दिनांक १२/०८/२०२२ रोजी अलिबाग येथे व दिनांक १३/०८/२०२२रोजी पेन येथे उपप्रादेशिक

परिवहन कार्यालय पेन (रायगड) यांच्या विद्यमाने अलिबाग स्थित श्री साई मोटार ट्रेनिंग स्कूल व रॉयल मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाचे नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी, अलिबाग व पेन शहरातून दुचाकी वरून रॅली काढण्यात आली. नागरिकांनी उत्साहाने या रॅलीमध्ये सहभाग घेतला या रॅलीमध्ये अलिबागवासीयांना व पेनवासीयांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री देवकाते साहेब व सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन

अधिकारी श्री माधव सुर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रमाला अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय जाधव साहेब यांची उपस्थिती लाभली, ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या तर्फे मोटार वाहन निरीक्षक श्री. किरण पाटील, श्री सुरेश तूरकणे, श्री नंदन राऊत तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक १३/०८ /२०२२रोजी पेण तालुक्यातील रॅली मध्ये वरीष्ठ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. देवकाते साहेब, स. प्रा. प. अधिकारी श्री. सूर्यवंशी साहेब तसेच सर्व कार्यकारी अधिकारी (मोवनि), सर्व समोवानी,कर्मचारी, रायगड येथील सर्व मोटर ट्रेनिंग स्कूल व इतर सर्व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. सदर उपक्रमाला अलिबाग व पेन येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]