नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी वार्षिक तपासणी अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली – आजचा महाराष्ट्र

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी वार्षिक तपासणी अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली

पत्रकार जितीन शेट्टी

रायगड {पनवेल }पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध  व इतर सर्व कामकाज कौतुकास्पद असून कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी वार्षिक तपासणी अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यास  भेट दिली असता केले.

 

यावेळी पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह यांचे स्वागत परिमंडळ -०२ चे पोलीस उपायुक्त श्री. शिवराज पाटील ,सहा. पोलीस आयुक्त श्री. भागवत सोनावणे,वपोनि श्री. रवींद्र दौंडकर तसेच इतर अधिकारी वर्गांनी केले. तसेच श्री. बिपीन कुमार सिंह यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी केली तद्नंतर पनवेल तालुका पोलीस ठाणेतील सर्व अधिकारी, अंमलदार  यांची  एकत्रित बैठक आयोजित  करून त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले . पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील बंधू, भगिनींची मंथन हॉल येथे बैठक आयोजित करून त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची नेमकी काय भूमिका असायला पाहिजे कसे कामकाज करायला हवे ?यावर योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाणे मधील किमती व साधारण मुद्देमालाचे निरक्षण करून संपूर्ण अभिलेख तपासून

पोलीस ठाणेचे एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व यापुढेही अशीच कामगिरी ठेवण्याच्या सूचना दिल्या.पनवेल तालुक्याचा परिसर व तेथील स्वछता, नीटनेटकेपणा ,कामकाजाची पद्दत , गुन्ह्यांची केलेली उकल या सर्व गोष्टीबाबत वपोनि श्री. रवींद्र दौंडकर यांचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी  खास करून कौतुक केले .

फोटो – नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह पोलीस ठाणे परिसराची पाहणी करतांना

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]