नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंतराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कल्याण संवर्धन संस्था (पुणे) यांच्यातर्फे आदिवासी समाजातील लोकांना एकत्र करून विविध कार्यक्रम राबविण्यात आले – आजचा महाराष्ट्र

आंतराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कल्याण संवर्धन संस्था (पुणे) यांच्यातर्फे आदिवासी समाजातील लोकांना एकत्र करून विविध कार्यक्रम राबविण्यात आले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी { खेड } :- आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त ‘आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था’ (पुणे) यांच्यासह खेड तालुक्यातील डोंगर दर्याखोर्यांमध्ये वसलेल्या गाव-वडगाव, बिरमणी, कांदोशी,आस्तान या गावातील सर्व आदिवासी समाजातील अनेक लोकांनी एकत्र येऊन

पारंपरिक आदिवासी वेशभूशा, आदिवासी नृत्य, गाणी,ओव्या असे विविध उपक्रम जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी

बांधवां मार्फत राबविण्यात आले होते.या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पैकी श्री. अनंत सोनु कांबळे (अध्यक्ष),श्री.कृष्णा देऊ कांबळे (उपाध्यक्ष),श्री.अजय विजय

नलावडे (सचिव) तसेच समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात असा एकमेव चांगला कार्यक्रम झाला आहे .आज कोकणातील आदिवासी समाज एकत्र येत आहे.ही खुप चांगली बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]