नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक आदिवासी दिनानिमित्तखारघर येथे आदीवासी बांधवांसाठी विविध कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

जागतिक आदिवासी दिनानिमित्तखारघर येथे आदीवासी बांधवांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

पत्रकार सुनिल ठाकुर

पनवेल :- खारघर,येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त, अनुसूचित जमाती मोर्चाचे खारघर – तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता कांबडी व सहकाऱ्यांनी बेलपाडा आदिवासी वाडी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली, यानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी

बांधवांना उद्देशून भाषणे केली. या मध्ये त्यांनी केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील व्यक्ती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना स्थान देण्याचा भाजपाच्या भूमिकेची स्तुती व गौरवोद्गार काढले. उपस्थित आदिवासी बांधवांना अल्पोपाहार सोबत भेट वस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला भाजपा तळोजा मंडळाचे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल, मा. नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष श्री संजय घरत, सरचिटणीस श्री दिपक शिंदे, सस्मित डोळस आदी मान्यवर व मोठय़ा संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]