नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षता मित्र मंडळाच्या वतीने भव्य वैद्यकीय आरोग्य शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला – आजचा महाराष्ट्र

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षता मित्र मंडळाच्या वतीने भव्य वैद्यकीय आरोग्य शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड:-दक्षता मित्र मंडळ हे मंडळ घाटकोपर मधील उंच टेकडी म्हणजे खंडोबा टेकडी जय मल्हार नगर या ठिकाणी आहे. हे मंडळ दरवर्षी नवीन नवीन कार्यक्रम आणि उपक्रम मंडळातर्फे राबवत असतात. त्यातील एक उपक्रम म्हणून रविवार दिनांक ७ जुलै २०२२ रोजी या मंडळातर्फे आपल्या भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पावसाळ्यात उद्भवणारे आजार प्रामुख्याने ताप , सर्दी , खोकला , अंगदुखी , डोकेदुखी, डायबीटीस आणि डोळे तपासणी इत्यादी आजारांवर प्राथमिक उपचार या शिबिरा मध्ये करण्यात आले.

या आरोग्य शिबीराचा लाभ जय मल्हार नगर विभागातील शंभर पेक्षाही जास्त राहिवाश्यांनी घेतला. या शिबिरास स्पार्क लाईफ केयर चे डॉ. सुनिल बर्गे साहेब आणि त्यांची संपूर्ण टिम यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सर्व टीमचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानले तसेच जय मल्हार नगर विभाग कमिटी सदस्य सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते त्यांचे ही मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच मंडळामध्ये विविध उपक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्याची कारणे येथे राहणारे रहिवाशी , मंडळातील सर्व सभासद येथील जेष्ठ कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष , सेक्रेटरी, खजिनदार आणि मंडळ कमिटी या सगळ्यांचे खूप लाखमोलाचे सहकार्य लाभते. म्हणून मंडळ दरवर्षी नवनवीन कार्यक्रम आयोजित करून व्यवस्थित रित्या संपन्न करत असतात. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रम ला उपस्थिती दाखवली त्या सगळ्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]