नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , योग्य वेतन द्या, नाही तर आंदोलन! आमदार महेश बालदी यांचा अमेटी युनिव्हर्सिटीला इशारा – आजचा महाराष्ट्र

योग्य वेतन द्या, नाही तर आंदोलन! आमदार महेश बालदी यांचा अमेटी युनिव्हर्सिटीला इशारा

पनवेल (प्रतिनिधी) :- अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त कामगारांना योग्य वेतन द्यावे,अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटीविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा आमदार महेश बालदी यांनी घेतला आहे. 

पनवेल अमेटी युनिव्हर्सिटीच्या कामगारांचे शोषण या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी अमेटी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये साधारण १०० प्रकल्पग्रस्त कामगार विविध विभागामध्ये कार्यरत आहेत. आणि या अस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतना पेक्षा कमी पगार दिला जात आहे. असे माझ्या निदर्शनास आले असून मध्यंतरीच्या काळात सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त पनवेल यांच्याकडे या संदर्भात दावा दाखल केला होता, मात्र अमेटी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाने उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ काढू पणाची भूमिका घेतली आहे. सदर भूमिका कामगारांवर अन्याय करणारी आहे, त्यामुळे कामगारां वरील अन्याय दूर करण्यासाठी सबंधित पत्राची दखल घेऊन कामगारांच्या वेतना संबंधित बैठकीचे आयोजन करून स्थानिक कामगारांना न्याय द्यावा अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापना विरुद्ध तीव्र स्वरुपात आंदोलन छेडले जाईल सदर आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तसेच त्यामुळे होणाऱ्या परिणामास सबंध अमेटी युनिव्हर्सिटी व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार राहील.असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]