खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सायबर गुन्हे बाबत पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले*

रत्नागिरी/खेड:- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी प्रशालेमध्ये आज सायबर गुन्हे संदर्भात मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी खेड पोलीस ठाणे उप निरीक्षक
श्रीमती.सोनाली झेंडे मॅडम,पोलीस काॅन्स्टेबल श्री.संकेत गुरव,श्री.जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपजी राणे,सेक्रेटरी श्री.चंद्रकांत दळवी,सरपंच सौ.शर्मिला दळवी,उप सरपंच शैलेश दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री विशाल दळवी, पोलीस पाटील श्री मनोहर दळवी,श्री.अमोल दळवी,मुख्याध्यापक श्री.पाटील सर,सर्व
शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच पूजन व दिपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान व स्वागत करण्यात आले
मुख्याध्यापक श्री.पाटील सर यांनी सायबर गुन्हेवर आधारित प्रास्ताविक सादर केले तसेच खेड पोलीस ठाणे उपनिरीक्षक श्रीमती. सोनाली झेंडे मॅडम यांनी सायबर जगतातील गुन्हेगारी या विषयावर आधारित विद्यार्थ्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले तसेच हर घर तिरंगा या मोहीमेअंतर्गत माहीती दिली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला,सूत्रसंचालन श्री विजयराजे दळवी सर यांनी केले व मान्यवरांचे आभार श्री प्रमोद दळवी सर यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













