घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यासाठी श्री रत्नागिरीचा राजा मित्र मंडळाचा पुढाकार

रत्नागिरी :- माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली * घरोघरी तिरंगा * या अभियानाला प्रसिद्धी देण्यासाठी कार्यकर्ते कार्यरत राहणार…

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात नायक/क्रांतीकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमानसांत राहावी, या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ऑगस्ट 2022 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने श्री रत्नागिरीचा राजा मित्र मंडळाच्या , कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली “घरोघरी तिरंगा” या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता प्रसार, प्रसिद्धीसाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी येथे उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निवासी जिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांच्या हस्ते भारतीय तिरंगा घेतला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते लाल्या खातू,राजन शेट्ये,निमेश नायर,मनोज साळवी,अमरेश पावसकर,दीपक पवार,मनिष मोरे,नेताजी पाटील,अभि दुढे,अभिजित गोडबोले,प्रथमेश साळवी,प्रवीण साळवी,निलेश नांदगावकर,गणेश धुरी,करुणेश इंदुलकर,प्रसाद गिरकर,अथर्व पांगम,दुर्वेश पांगम,अभि घोडके,शुभम सावंत,मंदार ढेकणे,मिलिंद देसाई,सागर भिंगारे,लोभस देसाई,अविनाश माने,प्रवीण भाताडे, ओंकार मेस्त्री, उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













