नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वयंभू श्री धावीर महाराज यांचे मूळस्थान असलेले गाव:- वराठी येथिल रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…… – आजचा महाराष्ट्र

स्वयंभू श्री धावीर महाराज यांचे मूळस्थान असलेले गाव:- वराठी येथिल रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य……

रायगड/रोहा प्रतिनीधी :- निकृष्ट दर्जाचे काम त्यामुळे रस्त्यांची झालेली सध्याची स्थिती यामुळे वाहने चालवायचे म्हणजे मनात धडकीच भरते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्नच पडतो.

या धोकादायक परिस्थितिचा उलगडा करणेही फार कठीण झाले आहे. कारण मुख्य शहर असो किंवा गाव ठिकाण कोणत्याही अंतर्गत रस्त्यावर पाहिले तरी खड्डे ‘पाठ’ सोडत नाहीत.

रोहा तालुक्यातील आराध्य दैवत स्वयंभू श्री धावीर महाराज यांचे मूळस्थान असलेले गाव *वराठी* येथिल रस्त्याची सुद्धा हीच अवस्था आहे संपूर्ण रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे . रोहा मुरुड भालगाव मार्गे असलेला मुख्य असणारा हा रस्ता अक्षरशः प्रवाशांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. सर्वच प्रकारची मोठं मोठी वाहने या रस्त्यावरून येजा करत असतात खड्ड्यानमधून निघालेली खडी यामुळे वाहने स्लिप होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे चुकवता चुकवता स्वतःचे जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे .शिवाय डोंगर भागातील हा रस्ता असल्याने अक्षरशः जीव मुठीत घेऊन लोक या रस्त्याने नेहमी प्रवास करत आहेत. अशा परिस्थिती भयानक परिस्थिती मध्ये मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वाहनांचे अपघात होने अशा गोष्टीना आमंत्रण हे खड्डे ठरू शकतात. कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी लवकरात या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी वराठी गावातील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]