नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या सौजन्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न – आजचा महाराष्ट्र

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या सौजन्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड:- लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा कशेडी लिटी या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, छत्री, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, ड्रॉइंग वही व अन्य शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यासाठी लायन्स क्लब खेड सिटीचे सदस्य तथा ओम साई मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर श्री. प्रवीण पवार व कुमारी श्वेता विलास विचारे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

याच दरम्यान जिल्हा परिषद शाळा कशेडी लिटी या शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये शुगर, बीपी, डायबेटीस यासह अन्य तपासण्या करण्यात आल्या.

या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष डॉक्टर श्री. विक्रांत पाटील, डॉक्टर श्री.वीरेंद्र चिखले, खजिनदार श्री.मिलिंदशेठ तलाठी, माजी अध्यक्ष श्री.ओंकार गोंदकर, उद्योजक श्री.रोहन विचारे, श्री.सुरेश चिकणे सर, डॉक्टर सौ.वैष्णवी पाटील, सौ.अनुष्का गोंदकर इत्यादी मान्यवर सदस्य लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने उपस्थित होते.

    ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य व अन्य सुविधा पुरविण्याचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा यापुढेही कायम मानस राहणार आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्य करण्यात एक वेगळे आत्मिक समाधान लाभत असून त्याची बरोबरी अन्य कोणत्याही कार्यासोबत होऊ शकणार नाही अशी भावना याप्रसंगी डॉक्टर श्री.विक्रांत पाटील यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केली. याच बरोबर प्रत्येक क्षण शिकवून जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन माणसाला देतो व त्यातूनच आपली जीवनरुपीनौका पुढे यशस्वी मार्गक्रमण करत असते असे विचार उद्योजक श्री.रोहनशेठ विचारे यांनी व्यक्त केले.

 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लाभासह महत्त्वाची आरोग्य तपासणी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.मंगेश चाळके सर व पदवीधर शिक्षक श्री.शरद भोसले सर यांनी लायन्स क्लब ऑफ सिटी खेडच्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. लायन्स क्लब खेड सिटीचे कार्य उत्तरोत्तर अशाच पद्धतीने द्विगुणीत होवो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

यापुढेही ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी असेच लायन्स क्लबचे कार्य अविरत सुरू राहो असे प्रेरणादायी आभार मानत या शैक्षणिक साहित्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]