OLX Fraud: ओएलएक्स वरून फसवणूक करणाऱ्याला अटक
प्रतिनीधी चाकण :- ओएलएक्सवर कार विक्रीची जाहिरात देऊन एका ग्राहकाची सहा लाख रुपयांची फसवणूक करून पळून जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (OLX Fraud) ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी तिरंगा हॉटेल जवळ, चाकण येथे घडली.

मिलिंद मधुकर गुंजाळ (वय 32, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी सुनील (वय 21, रा. सुसगाव, ता. मुळशी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचा काका आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी याने त्याची कार (एमएच 12/पीएच 5554) विक्रीबाबत ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात दिली. ती कार विकत घेण्यासाठी फिर्यादी गुंजाळ यांनी सनीला संपर्क केला. गुंजाळ यांचा विश्वास संपादन करून सनी याने सहा लाख 70 हजार रुपयांना कारचा व्यवहार ठरवला. (OLX Fraud) सुरुवातीला 1 हजार 100 रुपये टोकन रक्कम ऑनलाईन घेतली. त्यांनतर गुरुवारी दुपारी चाकण येथील तिरंगा हॉटेलजवळ गुंजाळ यांना उर्वरित पैसे घेऊन बोलावले. गुंजाळ यांनी सहा लाख 20 हजार रुपये सनीला दिले. आरोपींनी गुंजाळ यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कार न देता त्यांची फसवणूक करून पळ काढला. पोलिसांनी सनीला अटक केली आहे.याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













