नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारताच्या राष्ट्रपती पदी मा. द्रौपदीजी मुर्मू ह्या विराजमान – आजचा महाराष्ट्र

भारताच्या राष्ट्रपती पदी मा. द्रौपदीजी मुर्मू ह्या विराजमान

रायगड/रोहा प्रतिनीधी:-भारताच्या राष्ट्रपती पदी मा. द्रौपदीजी मुर्मू ह्या विराजमान होणार याचा आनंदोत्सव भाजपा रोहे शहराच्यावतीने एका अनोख्यापद्धतीने साजरा करण्यात आला. रोहे शहरात दररोज व्यवसायासाठी येणाऱ्या आदिवासी महिलांचे तोंड गोड करून हा आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने शहरात सर्वांच्या वतीने राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.

हा कार्यक्रम भाजपा रोहे शहर अध्यक्ष यज्ञेश भांड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तसेच उपाध्यक्ष राकेश गुंदेशा, सरचिटणीस नरेंद्र घावनळकर, महिला मोर्चा रोहे तालुका अध्यक्षा जयश्री भांड, शहराध्यक्षा ज्योती सनिलकुमार, जिल्हा चिटणीस मेघना भांड तसेच भाजपा रोहेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश शेडगे, मार्तंड भांड, सुलोचना हुगे इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]