नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, (मान्यताप्राप्त) शाखा – खेड, जि. रत्नागिरी – आजचा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, (मान्यताप्राप्त) शाखा – खेड, जि. रत्नागिरी

रत्नागिरी/ खेड पत्रकार राजेंद्र दळवी

संघटनेच्या हिरक महोत्सवी (६० व्या) वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी,निवृत्त शिक्षक सत्कार/ शुभेच्छा सोहळा आयोजनाबाबत….

खेड :-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या हिरक महोत्सवी (६० वा) वर्धापन दिनाचे औचित्य साधत रविवार दिनांक – २४ जुलै २०२२ रोजी खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक वर्ष सन २०२१/२०२२ मधील इयत्ता १०वी, व इयत्ता १२ वी परीक्षेतील गुणवंत पाल्य, डिग्री, डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण, शिष्यवृत्ती,नवोदय प्रवेशपात्र, B.D.S., M.T.S. गुणवत्ता यादी आलेले /मेडल प्राप्त विद्यार्थी, जि.प. शाळेतील शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक/ नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी, खेड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी, आदर्श शाळा यांचा सत्कार/ शुभेच्छा सोहळा गणेश मंगल कार्यालय कालकाई मंदिर शेजारी भरणे येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
दर वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना, जि.प शाळेतील गुणवत्ता धारक मुलांना प्रोत्सहान देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येतो. कोरोनामुळे गेले दोन वर्ष याचे आयोजन करता आले नाही. तरी या वर्षीच्या आयोजित गुणगौरव सोहळ्यासाठी सर्व सभासद बंधुभगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री.शरद भोसले, सरचिटणीस श्री.अशोक आकुसकर यांनी केले आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]