खेड. तालुका. खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था प्रशालेमध्ये सामाजिक वनीकरण विभागा तर्फे वृक्षारोपण करण्यात आले

खेड:- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी प्रशालेमध्ये आज दि 19/07/2022 रोजी सामाजिक वनिकरण विभाग खेड यांच्या माध्यमातून, हरित सेनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वृक्ष 
लागवड करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी श्रीम.जयश्री फुंदे मॅडम, ( वनरक्षक सामाजिक वनिकरण खेड) तसेच श्री अशोक ढाकणे ( वनरक्षक काडवली), प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही .एस पाटील सर,हरित सेना शिक्षक श्री .व्ही. सी .दळवी सर , श्री सावंत सर , सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते 
मान्यवरांनी वृक्ष लागवड व संगोपनाविषयी मार्गदर्शन केले तसेच वृक्षारोपण मानवाच्या तसेच पर्यावरणविषयक किती महत्वाचे आहे यासंबंधी अनेकांनी आपली मते मांडली व भविष्यात ही वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













