Hrithik Roshan आणि सबा आझादचे लग्न? ज्योतिषतज्ञ बेजान दारुवाला म्हणाले…

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)सबा आझादला(Saba Azad) डेट करतोय हे काही आता लपून राहिलेले नाही. अर्थात फायनली आपल्या लाडक्या अभिनेत्याचं घर बसतंय हे जाणून त्याचे चाहते खूशच झाले आहेत. आता सगळे चातकासारखे वाट पाहतायत ते आपल्या लाडक्या कलाकाराच्या दुसऱ्या लग्नाची. पण हृतिक आणि सबा स्वतःच्या नात्यावर ना खुलून बोलताना दिसतायत ना लग्नाची कुठली चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता प्रसिद्ध ज्योतिषी बेजाना दारुवाला(Bejan Daruwalla) यांनी हृतिकच्या चाहत्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी हृतिक आणि सबा लग्न करणार की नाही यावर आपलं ज्योतिषशास्त्र काय म्हणतंय याविषयी खुलासा केला आहे.(will Hrithik marry saba Azad? what bejan daruwalla predicted?)

बेजाना दारुवाला नेहमीच आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे बॉलीवूड सेलिब्रिटींबाबतील भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांचं ज्योतिष खरं ठरलंय बरं का. सध्या ते गुजरात मध्ये राहतात पण मुंबईत कामानिमित्तानं त्यांचे येणेजाणे चालूच असते. पण मुंबईपासून लांब गेल्यावरही गुजरातमध्ये बसून मुंबईतील मायानगरीत राहणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते डोकावताच. हृतिकच्या दुसऱ्या लग्नाविषयी देखील त्यांनी आपलं मत मांडलं आहे,म्हणजेच भविष्य वर्तवलं आहे. काय म्हणालेत बरं बेजान दारुवाला?
जेव्हा सुझेन आणि हृतिक यांचा घटस्फोट झाला होता तेव्हा बेजान दारुवाला म्हणाले होते,”हृतिक दुसरं लग्न करणार”. अर्थात तेव्हा हृतिक कुठल्याही नात्यात नव्हता. सध्या हृतिक सबा आझादला डेट करतोय. ते दोघे एकमेकांच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आहेत. दोघेही सध्या लंडनमध्ये आहेत. आणि सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना दिसत आहेत.काही वर्षांपूर्वी हृतिकच्या घटस्फोटाच्या वेळेस बेजान दारुवाला म्हणाले होते,”हृतिक दुसरं लग्न करणार” असं त्यांचे ज्योतिषशास्त्र म्हणतेय. तेव्हा त्यात फार तथ्य वाटलं नव्हतं. पण आता ज्या पद्धतीनं हृतिक-सबा एकमेकांच्या जवळ आहे,दोन कुटुंबात नातं निर्माण होताना दिसतंय ते पाहून तरी वाटत आहे हृतिक दुसरं लग्न करणार,आणि कदाचित त्याची दुसरी पत्नी सबा आझादच बनणार.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













