मिशन एज्युकेशन सपोर्ट वॉरिअर्स, मुंबई तर्फे खवटी शिक्षण संस्था, येथे ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

खेड :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी, प्रशालेमध्ये दि १९/०६/२०२२ , वार रविवार रोजी मिशन एजुकेशन सपोर्ट वाॅरिअर्स ,मुंबई अंतर्गत ग्रामिण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

या कार्यक्रमा प्रसंगी , सन्मा श्री सागर बोरनारे साहेब (CBI GAZZETTED अधिकारी) , श्री. हरिबा सोनावणे (BMC अधिकारी) , श्री. अनिल झोरे (EX-L&T, संस्थापक संचालक ज्ञानमंदिर हायस्कूल मुंबई) , सौ.रागिणी झोरे ( मॅकॅनिकल इंजिनीयर, संचालक ज्ञानमंदिर हायस्कूल मुंबई)
श्री.रामचंद्र आखाडे, श्री.भंडारी ( सामाजिक कार्यकर्ते)
तसेच संस्था उपाध्यक्ष श्री.दिलीप राणे, सेक्रेटरी श्री.चंद्रकांत तुकाराम दळवी, मुख्याध्यापक श्री .पाटील सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मित्र उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री .दिलीप राणे साहेब यांनी भूषविले, कार्यक्रमाची सुरूवात विद्येची देवता सरस्वती मातेच पूजन व दिपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर सर्व मान्यवरांच यथोचित सन्मान व स्वागत करून मान्यवरांनी विद्यार्थ्याना मिशन वाॅरियर्स संस्थेचा उद्देश व प्रेरणादायी मार्गदर्शन केले मिशन एज्युकेशन सपोर्ट वाॅरियर्स, मुंबई अंतर्गत ग्रामीण भागातील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करत असताना ,आपल्या प्रशालेमधील १७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक

किट वाटप करण्यात आलेया किटमध्ये (यामध्ये दफ्तर, वह्या ,पेन, पेन्सिल, छत्री ई.शै .साहित्य ) लाभार्थी विद्यार्थी कु :प्रतिक मंगेश दळवी =ई.६ वी , कु :पार्थ गणेश यादव =ई ६ .वी,कु .सिध्दांत संजय धोत्रे =ई .६.वी, कु.रेष्मा राम आखाडे =ई.७.वी कु.निहाल विशाल दळवी =ई.७.वी, कु .महेश राम दळवी = ई.७ .वी कु.प्रथमेश सुभाष दळवी =ई.८ .वी, कु श्रावणी विशाल गमरे = ई.८ .वी , कु .समृद्धी प्रकाश दळवी =ई ९ वी , कु कोमल विजय देवळेकर=ई.९.वी , कु श्रावणी मनोज तांबे =ई ९ वी , कु रूपेश भरत वाघे =ई ९ वी , कु करण संतोष झोरे =ई १० वी , कु रितेश राजू वाडकर =ई १० वी , कु राजेश गजानन सागवेकर =ई १० वी , कु राकेश धोंडू मोहिते =ई १० वी , कु प्रेमा संतोष झोरे =ई १२ वी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले

यानंतर अध्यक्षीय मनोगत श्री दिलीप राणे यांनी केले
श्री विजयराजे चंद्रकांत दळवी सर यांनी सूत्रसंचालन केले, सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले
कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













