स्वतःच्या सन्मानाची अपेक्षा न बाळगता गेल्या १८ वर्षांपासून आपल्या वाढदिवशी भिवंडीतील पत्रकारांचा सन्मान करणारे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील
प्रतिनिधी
शुभेच्छा देतांना डॉ.सोन्या पाटील यांचे गौरवोद़गार….
ठाणे ( भिवंडी) :- ( आ. मा. टॉ. टे. न्यु.) दै. ‘स्वराज्य तोरण’चे संपादक तथा स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील हे गेल्या १८ वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःचा वाढदिवस साजरा न करता आणि कोणताही सत्कार स्वीकारण्याऐवजी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बंधू-भगिनींचा सन्मान करीत आहेत. 
पत्रकारितेच्या क्षेत्रातील सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा त्यांचा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मत समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.२२ सप्टेंबर हा डॉ. किशोर पाटील यांचा वाढदिवस. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी याच दिवशी भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील सुमारे ८० ते ९० पत्रकार बंधू-भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा जपली आहे. विशेष म्हणजे, स्वतःचा सत्कार करून घेण्याऐवजी पत्रकारांचा सत्कार करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.याबाबत बोलताना डॉ. सोन्या काशीनाथ पाटील म्हणाले की, एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. एका पत्रकाराने पहिल्यांदाच आपल्या वाढदिवसानिमित्त इतर पत्रकारांचा सन्मान केल्याचे त्या बातमीत नमूद करण्यात आले होते. ती बातमी वाचल्यानंतर माझ्या मनात डॉ. किशोर पाटील यांचा विचार आला.“डॉ. किशोर पाटील हे आपल्या आगरी समाजातील दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक आहेत. गेल्या १८ वर्षांपासून ते स्वतःचा वाढदिवस साजरा न करता पत्रकार बंधू-भगिनींचा सन्मान करीत आहेत. एवढ्या वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या कार्याबद्दल एखाद्या पत्रकाराला किंवा वर्तमानपत्राला बातमी करावी असे का वाटले नाही, हा प्रश्न मनात निर्माण झाला. म्हणूनच गेल्या १८ वर्षांत प्रथमच आज माझ्या मनातील भावना प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करीत आहे,” असेही डॉ. सोन्या पाटील यांनी सांगितले.पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची डॉ. किशोर पाटील यांची ही परंपरा केवळ सत्कारापुरती मर्यादित नसून पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे डॉ. सोन्या पाटील यांनी नमूद केले.स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःचा गौरव करून घेण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्याची गेल्या १८ वर्षांची ही परंपरा पत्रकारिता क्षेत्रातील एक वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे. त्यामुळे या उपक्रमाची समाजासमोर नोंद व्हावी, या भावनेतून आपण प्रथमच याबाबत बोलत असल्याचे डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांनी स्पष्ट केले.व या बातमीनंतर कोणाल तरी वाटावे की,डॉ. किशोर पाटील यांची बातमी तयार करायला हवी हाच एकमेव माझा उद्देश आहे….
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













