पालघर जिल्हाध्यक्षा अंजली चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात!
आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप उपक्रम उत्साहात संपन्न…
पालघर :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली स. चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाज कल्याण महाराष्ट्र राज्याचे 
संस्थापक अध्यक्ष तथा धर्म सेवक डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी वाडा तालुक्यातील विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायसल लोहार पाडा, जिल्हा परिषद शाळा आमगाव शिंदीचा पाडा तसेच सरस्वती विद्यामंदिर, कंचाड येथील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच आरोग्य शिबिर व खाऊचेही वाटप करण्यात आले.यावेळी रायसल 
लोहार पाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. किशोर पवार, आमगाव शिंदीचा पाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. नवनाथ शिंदे, सरस्वती विद्यामंदिर कंचाडचे शिक्षक श्री. नितीन डबके, गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित 
होते.दरम्यान, पालघर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली स. चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व शिक्षकांनी कौतुक केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













