पारसिक बँकेचे संस्थापक गोपीनाथ पाटील आपल्याला होता येणार नाही परंतु त्यांच्या मार्गावर आपण चालू शकतो- विश्वास थळे
प्रतिनिधी
आपण सभासदांशी, कर्जदारांशी व खातेदारांशी आदराने वागलो तर पुढील गोष्टी ह्या सुखकर होत असतात-भरत माळी
सह्याद्री नागरी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक ९ / ९ / २०२६ रोजी शांती चंदन सभागृह ओसवाल हायस्कूल
अंजुरफाटा येथे मोठ्या उत्सापूर्ण वातावरणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री.विश्वास थळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तज्ञ संचालक श्री.कृष्णकांत कांडळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती
श्री.जयनाथ भगत,दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील, पारसिक जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी श्री.भरत माळी,मासाहेब पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.मदन 
(अण्णा) पाटील,श्री सखी महिला पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा सौ.रंजना मुकादम, संचालिका सौ. वैजयंती विश्वास थळे, शिवसेना शाखाप्रमुख श्री.अनंता भामरे उपशाखाप्रमुख श्री.दयाराम पाटील,श्री.नरेंद्र पाटील,आदी मान्यवर संचालक, कर्मचारी वर्ग, 
दैनंदिन ठेव प्रतिनिधी व मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होते.आता जे अहवालातील आकडे वाचले ते मला पेनाने लिहिता येणार नाही, कारण मी कमी शिकलेला आहे, परंतु एवढ्या
आकड्यांची प्रगती संस्थेने केली आहे त्याचा मला अभिमान आहे. आपण सर्व मित्र परिवार ,नातेवाईक, सगेसोयरे, यांनी सांगितलेली माणसे पतसंस्थेत कामाला लावली. ज्यावेळी ती कामावर रुजू झाली त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कौशल्य नव्हतं संस्थेने 
त्यांना आकार उकार देऊन कौशल्य भरवले.आज या ठिकाणी पारसिक बँकेचे शाखाधिकारी श्री.भरत माळी यांनी जे काही सांगितले ते ऐकण्यासाठी आपण लोणावळ्याला, पुण्याला जात होतो. आणि त्याचे तीन ते चार हजार रुपये फी भरत होतो.आज 
त्यांना फी द्यावी लागणार नाही, आपल्याला त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला व तो आपण फुकट ऐकला.३४ वर्षात कर्ज देताना आईच्या मायेने दिले मात्र वसूल करताना बापाच्या धाकाने आता वसूल करावे लागत आहे! व ते बऱ्यापैकी आता वसूल होत आहे.मित्रांनो सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जायाचे आहे, एकाने दुसऱ्याला पुढे ओढायचे आहे, कारण जो काय आपण जगन्नाथाचा रथ ओढवलेला आहे, तो भविष्यात आपल्या पश्चात ओढवणारी माणसे तयार व्हायला पाहिजेत. आज जी पारसिक बँक नावारूपास आहे त्या पारसिक बँकेचे संस्थापक गोपीनाथ पाटील आपल्याला होता येणार नाही परंतु त्यांच्या मार्गावर आपण चालू शकतो असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे यांनी सांगितले.भरत माळी यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे विचार व मार्गदर्शन आम्ही मनःपूर्वक ऐकलेत आणि त्या गोष्टीचा नक्कीच विचार करूआणी त्या मार्गाने जाण्याचा नक्की प्रयत्न करू. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर मधुर संगीताने झाली. त्यामुळे सर्व कलाकारांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट आज प्रथमच थळे साहेब उशिरा आल्याने सुरुवातीची पंधरा मिनिटे आनंद वाटला होता मला, त्यावेळेत प्रभारी अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली.पण तेवढ्या वेळेत मला थरारून घाम फुटलेला.की जबाबदारी काय असते अध्यक्ष पदाची ही पंधरा मिनिटांत मला समजली. त्यापेक्षा गेली सात- आठ वर्ष मी उपाध्यक्ष आहे हे चांगले आहे.थळे साहेबांच्या छत्रछायेखाली ते अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. मला सांगायला आवडेल आमचे ठेवीदार, कर्जदार व सभासद यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही मी सर्वांना आवाहन करेन की, आपण जरूर कर्ज घ्यावा. कर्जदार मी पण आहे. पैसा आपलाच बँकेमध्ये आहे, असं समजून जरूर वापरावा पण तो वेळेवर कसा देता येईल व त्यापासून आपली प्रगती कशी होईल त्याचा जरूर विचार करावा असे उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.संचालकांचे योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णय याच्यावर संस्थेची भरारी अवलंबून असते. विश्वास, पारदर्शकता, आणि उत्तम ग्राहक सेवा या तिन्ही गोष्टी डिपॉझिट आणि वसुली यांच्याशी निगडित आहेत. शेवटी ग्राहक हा राजा आहे आणि त्या भावनेतून आपण त्यांच्याशी वागलो पाहिजे.आणी त्यांना उत्तम ग्राहक सेवा दिल्यानंतर ग्राहकांचा आणि आपला संभाषण होण्यास सुरुवात होते. जेव्हा आरबीआयचे सत्र, ट्रेनिंग, मार्गदर्शन असेल तेव्हा पारसिक बँकेचे उदाहरण दिले जाते की, एनपीएचे (बुडीत कर्ज निधी) नियोजन तुम्हाला शिकायचं असेल,एनपीए तुम्हाला कमीत कमी राखायचे असेल तर पारसिक बँकेतील लोकांच्या तुम्ही संपर्कात रहा.मागच्या दहा वर्षा पासून बेस्ट एनपीए(बुडीत कर्ज निधी) नियोजनासाठी पारसिक बँक उत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार घेत आहे.बुडीत कर्ज निधी तुम्हाला कमी करायचं असेल तर, कर्जदाराला आपण सन्मानाने कर्ज वाटप केले पाहिजे.सर्व शाखाधिकारी यांना विनंती करतो की आपल्याकडे कोणी कर्ज घ्यायला सभासद येत असतील तर त्यांच्याशी आपण जिव्हाळ्याचे,कुटुंबा प्रमाणे कायमचे संबंध जपले पाहिजेत.तसेच कर्ज वितरित करताना त्यांच्यावर आपण कोणतीही मेहरबानी करत नाही कारण हे सहकार क्षेत्र आहे. शाखाधिकारी म्हणून आपण आपले कर्तव्य बजावत असतो. शाखाधिकार्यांनी प्रामाणिकपणे काम केला तर बुडीत कर्ज निधीचा प्रश्न निर्माण होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही संस्था ही बँक माझी आहे या उद्देशाने आपण जर काम केले तर आपल्याला कोणतीच अडचण निर्माण होत नाही.आपण सभासदांशी, कर्जदारांशी व खातेदारांशी आदराने वागलो तर पुढील गोष्टी ह्या सुखकर होत असतात. उत्तम ग्राहक सेवा, उत्तम कर्ज वाटप, उत्तम वसुली, आणी एनपीएचे उत्तम नियोजन कसे केले पाहिजे. यासाठी भिवंडी तालुक्यात आपल्या संस्थेचे नाव पुढे असायला पाहिजे. आज युथ वर्ग डिजिटल बँकिंग मध्ये उतरला आहे यासाठी आपणही एक पाऊल पुढे जाऊया.२४६ कोटींचा बिझनेस आहे तो एक हजार कोटींचा टप्पा ओलांडून कसा पुढे जाईल यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. असे पारसिक बँकेचे शाखा अधिकारी श्री.भरत माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री.विश्वास काळू थळे, उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील,संचालक श्री.देवराज किसन म्हात्रे,डॉ. प्रमोद मारुती पाटील,श्री.सुदाम नामा भोईर,सौ. स्नेहा सुरेश कारेकर,सौ. सुरेखा सोनबा जाधव,श्री.चक्रधरी मगन पाटील, श्री.मोहन लक्ष्मण गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय यशवंत पाटील,शाखाधिकारी टेमघर सौ.अनिता चंद्रकांत ताटे, शाखाधिकारी काल्हेर, श्री. दिलीप काशिनाथ पाटील, शाखाधिकारी शिवाजीनगर श्री. मेननाथ कृष्णा भोईर, शाखाधिकारी माणकोली सौ.संगीता किशोर पाटील, व्यवस्थापक कर्ज वसुली श्री.अनंता जैतु पाटील,शाखाधिकारी सावद श्री. संजय रमेश पाटील, व्यवस्थापक प्रशासन श्री. विजय गोपीनाथ पाटील,शाखाधिकारी खडवली श्री.गोरख मगन थळे, शाखाधिकारी अंबाडी श्री.जगदीश राजाराम पाटील, शाखाधिकारी पडघा श्री.केतन रमेश पुण्यार्थी ,शाखाधिकारी कोन श्री.योगेश सिताराम म्हात्रे,तसेच कर्मचारी वर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













