नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न! – आजचा महाराष्ट्र

शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

प्रतिनिधी

ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) दि.०९ भिवंडी तालुक्यातील मौजे खारबांव येथे असलेल्या शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी ची २२वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक ९/९/२०२६ रोजी संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंती कमलाकर तांगडी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात मुख्य कार्यालय पहीला मजला पोलीस चौकी समोर खारबांव येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे संस्थापक कमलाकर आत्माराम तांगडी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष महादेव नवश्या हांडवा, संचालक गुरुनाथ सखाराम म्हात्रे,

विनोद गंगाराम म्हात्रे, प्रवीण गोविंद पाटील, मंगलदास चांगो म्हात्रे, कमलाकर शंकर खारखंडी, रतिलाल जगन्नाथ नाईक, अमृत नारायण देवळीकर, सौ.सुनीता भालचंद्र म्हात्रे, अविनाश दिनकर

पाटील, जय जगन्नाथ पाटील, योगेश चंद्रकांत म्हात्रे (सल्लागार),संस्थेचे हितचिंतक बालनाथ पाटील, शिवाजी सखाराम भोईर (मुख्य कार्यकारी अधिकारी) शाखाधिकारी गणेश सुरेश म्हात्रे, सौ. उज्वला खुशाल गुळवी (कोपर), विशाल रमेश नाईक(बापगाव)

देवेंद्र रविकांत म्हात्रे (रोखपाल)लिपिक सौ.जागृती मोनेश घरत,तन्वेष सुरेश पाटील ,दैनंदिन ठेव प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी सखाराम भोईर (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी अहवाल वाचन करून केली. गेल्या २२ वर्षांमध्ये

संस्था ही अजून पर्यंत तोट्यात गेली नाही व जाणार नाही कारण आमचे सर्व संचालक हे सक्षम आहेत.२२ वर्षांमध्ये २२ रुपयांची अफराताफर झाली नाही.जर कोणी दाखवली त्याला एक लाख रूपये बक्षिस देईण असे मार्गदर्शन करताना संस्थापक कमलाकर

तांगडी यांनी सांगितले. आमचे कर्मचारी दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व ते जेव्हा काही अडचणीत असतील तेव्हा आम्ही सर्व संचालक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

राहू असे संचालक प्रविण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलावून आपण जो माझा सन्मान केला त्याबद्दल खरोखरंच मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.गेल्या वर्षी मी सांगितले होते की, शिवनेरी

दहा कोटींची उलाढाल करील खरोखरच चौदा कोटींची उलाढाल झाली. आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन..आता पुन्हा सांगतोय पुढील वर्षी वीस कोटींची उलाढाल व्हावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच दैनंदिन प्रतिनिधी व शाखाधिकारी यांनी ग्राहकांशी बोलतांना आपले पणाने बोलावे ,नम्रता अंगी बाळगावी,जेणेकरून समोरील व्यक्तीला आपल्या बद्दल आदर निर्माण होईल.असे प्रतेकाने केले तर नक्कीच पतसंस्थेची प्रगती होईल असे दै.स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकाधिकारी गणेश म्हात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी सौ उज्वला गुळवी हिने केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक कमलाकर तांगडी यांच्या मार्गदर्शना खाली सर्व संचालक ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,शाखाधिकारी,कर्मचारीवर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली….

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]