अलिबागमध्ये भरदिवसा घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड / अलिबाग :- (आ.मा.टॉ.टे.न्यू) दि .०७ शहरातील विद्यानगर परिसरातील प्रमिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत पोलिसांच्या नोंदीनुसार ८ लाख ११ हजार ५०० रुपये आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
स्पेश विश्वनाथ पाटील (वय ४०, व्यवसाय : शालेय शिकवणी, सध्या रा. बी-विंग, रूम नं. ०२, प्रमिला को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, विद्यानगर, ता. अलिबाग, जि. रायगड; मूळ रा. काले, पो. खंडाळ, ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या सदनिकेला चोरट्याने लक्ष्य केले.रविवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने सदनिकेच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा आणि लॉकर फोडून त्यामधील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, विविध प्रकारचे सोन्याचे हार, सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या, कानातील दागिने आणि नथ यांचा समावेश आहे. याशिवाय चांदीचे विविध दागिनेही चोरट्याने लंपास केले. तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेली पाचशे रुपयांच्या १६ नोटांसह एकूण ८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली.भरदिवसा सदनिकेचे लॉक तोडून झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला.या प्रकरणी फिर्यादी स्पेश विश्वनाथ पाटील यांच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(३) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोंडे करीत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













