नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , समाज कल्याण न्यासच्या वतीने नेवरे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप! – आजचा महाराष्ट्र

समाज कल्याण न्यासच्या वतीने नेवरे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप!

प्रतिनिधी

सामाजिक उपक्रमांसोबत माणसे जोडण्याचे काम डॉ. सोन्या पाटील करीत आहेत – डॉ. किशोर पाटील

ठाणे (शहापूर) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू.) शहापूर तालुक्यातील अघई केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे येथे समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक

साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषद शाळा नेवरे येथे पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे

म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील, समाज कल्याण न्यासच्या शहापूर जिल्हा सचिव सौ. रंजिता दुपारे, समाजसेविका सौ. विद्याताई वेखंडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्षा सौ. स्वाती कांबळे, मोहीली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.

निशिगंधा बोंबे, उद्योजक डॉ. श्री. भगवान हेंदर ठाकूर, माजी केंद्रप्रमुख श्री. सुनील बाबू पाटील, अघई केंद्रप्रमुख श्री. बाळकृष्ण धर्मा बिगर, पत्रकार प्रकाश जाधव, सागीर शेख तसेच शिक्षक श्री. संजय पाराजी शेटे, श्री. अशोक बाबुलाल टकले, सौ. प्रिती पंडित

पवार आदी मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. किशोर पाटील यांनी सांगितले की, “समाज कल्याण न्यासच्या माध्यमातून डॉ. सोन्या

पाटील हे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यासोबतच माणसे जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. संस्थेचा विस्तार व्हावा आणि अधिकाधिक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचावा, हा त्यामागील सकारात्मक उद्देश आहे.”समाज कल्याण न्यासच्या

माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान व आरोग्य शिबिरे, मॅरेथॉन, भजन, निबंध व चित्रकला स्पर्धा, नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत चष्मे वाटप, भाऊबीज भेट तसेच साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. असे त्यांनी सांगितले.यावेळी विद्याताई वेखंडे, स्वाती कांबळे, रंजिता

दुपारे निशिगंधा बोंबे व . बाळकृष्ण बिगर,यांनी समाज कल्याण न्यासच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून डॉ. सोन्या पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर माजी केंद्रप्रमुख सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत पावसाचे गाणे सादर करून मनोरंजनातून प्रबोधन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे, अघई केंद्रातील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. हेच मोठे समाधान संस्थेला मिळत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]