नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाएल्गार आंदोलनाआधी खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारेंना अटक – आजचा महाराष्ट्र

महाएल्गार आंदोलनाआधी खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारेंना अटक

प्रतिनिधी अमुलकुमार जैन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या घारेंवर प्रतिबंधात्मक कारवाई; कार्यकर्त्यांमध्ये संताप

रायगड (कर्जत) :– खालापूर तालुक्यातील टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीविरोधात ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाएल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.महाएल्गार आंदोलनाच्या नियोजनासाठी सुधाकर घारे हे खालापूर पोलीस ठाण्यात चर्चेसाठी गेले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतले. त्यानंतर घारे यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अलिबाग येथे नेण्यात आल्याची माहिती आहे.भूमिपुत्रांना स्थानिक उद्योगांमध्ये ८० टक्के रोजगार, स्थानिकांना ठेकेदारीत प्राधान्य तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी घारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.घारे यांना आंदोलनाच्या पूर्वसंध्येला ताब्यात घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, महाएल्गार आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध संस्था आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना खालापूर पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती आहे. कर्जत तालुक्यात संबंधित संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचून नोटिसा दिल्या जात असल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, पोलिसांनी घारे यांच्यावरील कारवाई प्रतिबंधात्मक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आंदोलनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना ताब्यात घेतल्याने उद्याच्या महाएल्गार आंदोलनाकडे आता संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]