धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिकांकडून अभिवादन!
प्रतिनिधी
ठाणे / भिवंडी:- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२७ शिवसेनेचे धर्मवीर, जनसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी भिवंडी शहरातील अजय नगर येथील शिवसेना शहर जिल्हा शाखा तसेच आनंद दिघे साहेब चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमास शिवसेना उपनेते विश्वास थळे, भिवंडी जिल्हा सहसंपर्कप्रमुख मनोज गगे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, तालुकाप्रमुख करसन ठाकरे,शहरप्रमुख पूर्व गजेंद्र गुळवी, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, जिल्हा सचिव जय भगत, माजी जिल्हा
संघटिका वैशालीताई मेस्त्री, पश्चिम सचिव नितेश दांडेकर,सचिव राजेंद्र काबाडी,माजी शहरप्रमुख मोहन वल्लाल, उपजिल्हा संघटिका वर्षा पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.उपनेते विश्वास थळे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मनोज गगे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील व तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांच्या हस्ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून आदरांजली वाहिली.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवेचा, सर्वसामान्य जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याचा आणि शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास शहर महिला समन्वयक संगीता जोशी, शांताराम जाधव, विजय कुंभार, योगेश घावरी, योगेश चव्हाण, सुनील कोकाटे, शंकर खामकर, मयूर कदम, विनोद भोई, नितीन काठवले, निलेश आळशी, अनिल मच्छा, मामा पुण्यार्थी, शरद पांडव, प्रताप शिंदे, विजय बलावकर, राजन काबाडी, अंजना संदुपाटला, पुरुषोत्तम वेमूला, मोहम्मद मोमीन यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













