नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी एसटीच्या तिकीट मशीनमध्ये छेडछाड; दहा प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे – आजचा महाराष्ट्र

स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी एसटीच्या तिकीट मशीनमध्ये छेडछाड; दहा प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे

प्रतिनिधी अमुलकुमार जैन

रायगड (आलिबाग ) :-  (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२६ एसटी प्रवाशांना चक्क बनावट तिकिटांचे वाटप करून महामंडळाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अलिबाग-पनवेल विना थांबा बसमधील दहा प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे दिल्याचे तपासणीत समोर आले. तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड करून हा प्रकार केल्याचा आरोप असून, संबंधित बस वाहकाविरोधात प्रशासकीय कारवाईबरोबरच पोयनाड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलिबाग-पनवेल दरम्यान एसटी महामंडळाच्या विना वाहक विना थांबा बससेवा सुरू आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वीच तिकीट दिले जाते. त्यानंतर बस अलिबागहून थेट पनवेलच्या दिशेने रवाना होते. मार्गात थांबे नसल्याने प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. कमी वेळेत पनवेल गाठता येत असल्याने नियमित बससेवेपेक्षा अनेक प्रवासी या बसला पसंती देतात.दरम्यान, १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेपाचच्या सुमारास पोयनाड येथील एसटी थांब्यावर भरारी पथकाने बसची तपासणी केली. तिकीट निरीक्षकांनी प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली असता, दहा प्रवाशांना देण्यात आलेल्या तिकिटांमध्ये गंभीर तफावत आढळून आली. विशेष म्हणजे दहा प्रवाशांना एकाच क्रमांकाची तिकिटे देण्यात आल्याचे तपासणीत समोर आले.निरीक्षण अहवालानुसार, संबंधित प्रवाशांची नोंद ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या प्रवर्गात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष प्रवाशांकडील तिकिटांवरील क्रमांक आणि संबंधित नोंदीमध्ये तफावत असल्याचे आढळले. त्यामुळे तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड करून बनावट तिकिटे तयार करण्यात आल्याचा संशय बळावला.या प्रकाराची खातेनिहाय चौकशी करण्यात आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. संबंधित बस वाहकाने कर्तव्य बजावत असताना महामंडळाकडून देण्यात आलेल्या तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच दहा प्रवाशांकडून रोख रक्कम स्वीकारून त्यांना बनावट तिकिटे दिली आणि ही रक्कम स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोयनाड पोलिसांकडून करण्यात येत असून, तिकीट मशीनमध्ये नेमकी कशी छेडछाड करण्यात आली, या प्रकारातून किती रकमेचा अपहार झाला आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.एकाच क्रमांकाची तिकिटे अन् गैरप्रकार उघड  दहा प्रवाशांच्या तिकिटांवर एकच क्रमांक आढळून आल्याने हा प्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास आला. तिकीट वितरण यंत्रणेतील छेडछाड उघड झाल्याने एसटी महामंडळाच्या तिकीट व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]