नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिंडीगड मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन! – आजचा महाराष्ट्र

दिंडीगड मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन!

प्रतिनिधी

ठाणे (भिवंडी) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू )दि. २५  दिंडीगड-सोनाळे येथे सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील हिंदू तरुणांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाज दिंडीगड बचाव समितीच्या वतीने सोमवारी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी भिवंडी ग्रामीण परिसरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.येवई नाका येथील महामार्गावरील पुलाखाली सकाळी ११ वाजता भिवंडी ग्रामीणमधील हिंदू बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर उपस्थितांनी मोर्चाच्या स्वरूपात एकत्र येत तालुका पोलीस ठाणे, भिवंडी येथे जाऊन संबंधित घटनेच्या निषेधाचे निवेदन पोलिस प्रशासनाला सादर केले.दिंडीगड-सोनाळे येथे झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच मारहाण झालेल्या तरुणांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदर घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.मोर्चात भिवंडी ग्रामीण परिसरातील विविध गावांमधून हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येवई नाका येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहत मोर्चात सहभागी होऊन झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला. त्यामुळेच सकल हिंदू समाजाची एकजूट यावेळी दिसून आली.सदर प्रसंगी निवेदन देताना सकल हिंदू समाजाचे नेते विशुभाऊ म्हात्रे, डॉ.यशवंत महादू सोरे ,जगन पाटील , विजय पाटील, ज्ञानेश्वर मुकादम ,ह.भ.प शनिवार वाकडे ….

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]