नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा (अभय ठाकूर ) – आजचा महाराष्ट्र

थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा (अभय ठाकूर )

प्रतिनिधी( सतिश पाटील )

मुंबई :-(आ. मा. टॉ. टे. न्यू )दि.२४  पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे Taurus The Gymचे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात तब्बल २०० किलो वजन उचलत त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदक मिळवत त्यांनी आपल्या नावावर दोन सुवर्णपदकांचा मान नोंदवला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खोपटे गाव, उरण तालुका आणि रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत अभय ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांची कामगिरी युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. Taurus The Gym परिवारासह क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही दोन सुवर्णपदके प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा क्रिडाप्रेमी मध्ये व्यक्त होत आहे.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]