गणेशोत्सव पूर्वी घाटातील एसटी वाहतूक सुरू करणे गरजेचे !
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
महाबळेश्वर वाडा प्रतापगड बस सुरू मात्र रायगड हद्दीत बंद !!
वरंध घाटातील पुणे जिल्हा हद्दीत चिखलाचे साम्राज्य ट्रक रुतला चिखलात !
रायगड (पोलादपूर):-(आ. मा. टॉ. टे. न्यू )दि.२५ रायगड व पश्चिम महाराष्ट्र ला जोडणारा व ब्रिटिश कालीन वाहतुकीसाठी प्रमुख रस्ता असणारा पोलादपूर महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गवरील पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक नैर्सगिक आपत्ती निहाय सद्य स्थितीत सर्व वाहतुकी साठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे पुणे ला जाण्यासाठी पाली खोपोली मार्गे तर कोल्हापूर सातारा साठी कुंभार्ली घाट पाटण मार्गे द्राविडी प्रवास करावा लागत आहे मात्र हा प्रवास द्राविडी व खर्ची होत असल्याने प्रवासी वर्गाचा वेळ वाया जात असला तरी प्रवासी वर्गाच्या खबरदारी साठी आंबेनली घाट चे रुंदीकरण चे काम सह या मार्गवर पावसाळी हंगामात दरड व मातीचे ओसरत कोसळत असल्याने या पूर्वी ३१ जुलै पर्यत बंद ठेवण्यात आला होता मात्र अद्याप तो एसटी वाहतुकी साठी बंदच आहे तर वरंध घाट चे काम अद्याप अपूर्ण असल्याने सलग ३ वर्षे या मार्गाने काम सुरू असल्याने हा मार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न येथील प्रवासी वर्गाला पडला आहे या मार्गवरील पुणे जिल्हा हद्दीत पावसात निसरड्या मातीने चिखल झाला असल्याने शुक्रवारी एक ट्रक चिखलात रुतल्याचे निदर्शनास आले
पोलादपूर महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गाचे काम चालू आहे त्यातच मुसळधार पावसात दरड चे सातत्य कायम राहिल्याने पावसाळ्यात व रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट काळात सदरच्या मार्गवरील उपाययोजना साठी सदरचा रस्ता जिल्हाधिकारी रायगड तर्फे या मार्गवरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली चे पत्रक काढण्यात आले होते 31 जुलै पर्यत वाहतूक बंद चे आदेश होते मात्र या नंतर कोणतेही नव्याने आदेश प्राप्त न झाल्याने या आंबेनळी घाटातील एसटी वाहतूक अद्याप बंदच आहे आहे
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचे सुधारणेचे काम कंत्राटदार आर पी पी एस आय पी एल( RPP-SIPL) (IV) याचेमार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. सदर रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासुन महाबळेश्वरकडे जाताना १ कि. मी अंतरावर दरडप्रवण क्षेत्र आहे. सदर ठिकाणी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगड गोठे व माती जुलै महिन्याच्या सुरवातीला रस्त्यावर आली होती सदर रस्त्यावर आलेली माती व दगड गोठे जेसीबीच्या सहायाने काढण्याचे काम कंत्राटदार ) याचेमार्फत बाजूला करण्यात आली तसेच वरुन अजुन माती व दगड येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता या मार्गवरून अक्कलकोट ,तुळजापूर कोल्हापूर मिरज सह महाबळेश्वर महाड मुंबई ,वाई महाड मुंबई ,पाचगणी महाड मुंबई ,सह नालासोपारा सह वसई पालघर आगराच्या बसेस महाबळेश्वर तालुक्यातील गावात येत असतात त्या बसेस सह पोलादपूर पारगाव खंडाळा स्वारगेट बस पुढील काही काळासाठी बंद ठेवत इतर मार्ग द्वारे सोडण्यात आल्या आहे अशी माहिती महाड पोलादपूर वाई महाबळेश्वर बस स्थानक मधून भ्रमणध्वनी द्वारे दिली आहेआंबेनली सह वरंध घाट वाहतुकी साठी बंद ठेवण्यात आल्याने व एसटी बसेस इतर मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवासी वर्गाला लांबच प्रवास करावा लागणार आहे पुण्याला जवळचा मार्ग म्हणून वरंध घाट ओळखला जातो मात्र त्या मार्गवरील एसटी वाहतूक बंद असल्याने पुण्याला जाणारी वाहतूक ताम्हणी मार्गे जात असते मात्र या पावसाळ्यात ती रस्ता पूर्ण पणे खचल्याने नव्याने बनविण्यासाठी काही दिवस गेले मात्र अद्याप परिपूर्ण मार्ग न झाल्याने अद्याप या मार्गवर एसटी बस अद्याप बंद आहे वरंध ,ताम्हणी महाबळेश्वर मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गवरील बहुतांशी बसेस कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक कुंभाली पाटण मार्गे वळविण्यात आली आहे मात्र या ही रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवासी वर्गाला वेळ लागत असून जादा रुपये मोजावे लागत आहे महामार्ग विभाग सह सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा पूर्वी घाट माथ्यावर उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे त्याच प्रमाणे पर्याय रस्ते निर्माण करणे गरजेचे बनले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













