नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगडमध्ये बोगस डाँक्टरचा पर्दाफाश सालिंघात प्रशासनाची धडक कारवाई. – आजचा महाराष्ट्र

रायगडमध्ये बोगस डाँक्टरचा पर्दाफाश सालिंघात प्रशासनाची धडक कारवाई.

प्रतिनिधी स्वाती जाधव

रायगड (अलिबाग) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि. २४ रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एल.अँड टी.काँलनी, सालिदे येथे वैघकीय पाञता नसतानाही डाँक्टर असल्याचे भासवून रूग्णांवर उपचार करणारा बोगस डाँक्टरवर प्रशासनाने धडक कारवाई केली.दीपकर सुशांत दास मूळ राहणार.चक जितीकापोटा,पश्चिम बंगाल याला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ आँगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोग्य विभागाकडून तपासणी

सुरू असताना सालिंदे येथील एका पडीक पञ्याच्या शेडमध्ये दीपक दास हा अनधिकृतपणे दवाखाना चालवत असल्याचे आढळून आले.तपासणीदरम्यान त्याच्याकडे मोठया प्रमाणात औषधे व इंजेक्शनचा साठा सापडला.अधिकारांनी त्यांच्याकडे वैघकीय पाञतेबाबत चौकशी केली असता कोणतीही वैघकीय शैक्षणिक पाञता नसल्याचे समोर आले. कारवाईत तब्बल ५४ हजार ६१४ रूपये किमतीचा औषध व इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. यापुर्वी कलकत्ता येथे कंपाउंडर म्हणून काम केल्याची माहिती त्याने अधिकारांना दिली. चौकशी सुरू असताना आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.ही कारवाई पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी प्राथमिक आरोग्य केंद्र गडबचे वैघकीय अधिकारी डाँ.चेतन अविनाश म्हाञे ,आरोग्य सहाय्यक दीपक पुंडलिक म्हाञे ,गणपत जानू वारगुडे ,उल्हास हिराजी म्हाञे,सागर सुनील पाटील आणि पोलीस काॅन्स्टेबल ठाकूर यांच्या पथकाने केली.या बोगस डाँक्टरला पथकाने वडखळ पोलिसांच्या ताब्यात दिले.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून वडखळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]