नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माउंटअबू येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनात सहभागी व्हा–ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील – आजचा महाराष्ट्र

माउंटअबू येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनात सहभागी व्हा–ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील

प्रतिनिधी

रायगड (अलिबाग) :– (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.24 श्रेष्ठ जग निर्माण करण्याच्या हेतूने मजबूत पत्रकारितेतील माहिती व आत्मिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने दिनांक 9 सप्टेंबर 2026 ते दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी राजयोग शिक्षण आणि शोध फाउंडेशन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थान येथे आयोजित केलेल्या महासंमेलनात सहभागी होत आपल्या ज्ञानात भर पाडून देशसेवा करावी असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष सिनियर जर्नालिस्ट लिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.यामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबर सकाळी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी सकाळी ९ ते १०- १५

राजयोग ध्यान पहिल्या सत्रात व्याख्यान दैनंदिन जीवनात ध्यानाचा उपयोग, दिनांक 10 सप्टेंबर सकाळी ६- ३० ते ७ पर्यंत शारीरिक व्यायाम, सकाळी राजे योग ध्यान दुसऱ्या सत्रात व्याख्यान अंतर यात्रेतील आत्म्याचा शोध सकाळी १० वाजता व्याख्यान, श्रेष्ठ जग निर्माण करण्यासाठी मजबूत पत्रकारिता दुपारी ४ वाजता व्याख्यान सत्य आणि पारदर्शक आधारित पत्रकारितेची जबाबदारी सायंकाळी ६ ते ८ पर्यंत व्याख्यान मनाच्या स्थिरतेसाठी राजयोग ध्यानाच्या शक्तीचा उपयोग रात्री ८. ४५ ते १० पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक 11 रोजी सकाळी ६- 30 ते 7 शारीरिक व्यायाम सकाळी ७ ते ८ राजयोग ध्यान सत्रात व्याख्यान परमेश्वराचा अनुभव सकाळी १० ते १०. ४० पर्यंत, व्याख्यान, चर्चा, पत्रकारितेमध्ये ए. आय. चा प्रवेश व जबाबदारी सकाळी ११. ४५ ते ११. ३० व्याख्यान व चर्चा मानवतेच्या आशा आकांक्षा बाबत पत्रकारितेची जबाबदारी सकाळी 11:45 ते 12:30 व्याख्यान सोशल मीडियाची गरज सायंकाळी ४ ते ६ पर्यंत व्याख्यान आध्यात्मिक मजबुती द्वारे पत्रकारितेची प्रगती संध्याकाळी ६. ३०ते. ८३० व्याख्यान शांती युगाच्या वाटचालीत पत्रकारितेची जबाबदारी शनिवार दिनांक 12 सप्टेंबर सकाळी ६. ३० ते ७ शारीरिक व्यायाम व्याख्यान शरीरातील आत्मिक शक्ती बाबतची माहिती सकाळी ९. ३०वाजता माउंट आबू दर्शन, रात्री ८ ते १० पर्यंत पत्रकारांचे अनुभव रविवार दिनांक 13 सकाळी 6:30 ते 7 शारीरिक व्यायाम, सकाळी ७ ते ८. 25 राजयोग ध्यानात व्याख्यान जीवनात नवीन संकल्प साठी चांगल्या कर्माने सफलता मिळते सकाळी 10 वाजता समारोप, यामध्ये पत्रकार क्षेत्रातील अनुभवींचे वरील विषयांवर मार्गदर्शन होणार आहे या राष्ट्रीय पत्रकार संमेलनात सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी आपल्या शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील केंद्रप्रमुख यांना भेटावे व आपली नोंदणी करावी, पत्रकार संमेलनात येताना लहान मुलांना सोबत आणू नये, महिला व पुरुषांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा. येथे पुरुषांसाठी वेगळी व स्त्रियांसाठी वेगळी निवास व्यवस्था असते. या राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनात पत्रकारिते बाबत अमोल ज्ञान, शांती,तसेच सोलर प्रकल्प, अद्यावत रुग्णालय, अद्यावत भोजनालय, मधुबन रेडिओ, एफ.एम. स्टेशन, दूरदर्शन केंद्र, बाजारात राजस्थानी कला कसुरीची खरेदीची संधी, देशभरातील पत्रकार मित्र-मैत्रिणींची ओळख असा लाभ महाराष्ट्रातील नव्याने पत्रकार क्षेत्रात आलेल्यांनी घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष सिनियर जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]