नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तिर्थदर्शनाचे आयोजन ६२ बस तिर्थदर्शनाकरिता रवाना. – आजचा महाराष्ट्र

तिर्थदर्शनाचे आयोजन ६२ बस तिर्थदर्शनाकरिता रवाना.

प्रतिनधी स्वाती जाधव

रायगड (आलिबाग ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू )दि. २३ सालाबादप्रमाणे यावर्षी महिला करिता वर्षा सहलीचे आयोजन दि.२१ व २२ आँगस्ट रोजी केले होते. यांमध्ये ६२ बसेसचा समावेश केला होता.महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय व्हायला नको म्हणून राजा केणीच्या समवेत रसिका केणी व आदि कार्यकर्ते महिलांच्या सोबत उपस्थित होते. महिलाना कोणतीही वैघकीय अडचण आल्यास अँब्युलन्स सेवा डाँक्टर देखील सोबत ठेवण्यात आले होते.या तिर्थदर्शनामध्ये सात तिर्थदर्शन दाखविले गेले.वरद विनायक रांजणगाव,शनिशिंगणापूर, शिर्डी मोरगाव,जेंजुरी,एकविरा या तिर्थाचा समावेश होता. राजाभाई व रसिका ताई स्वता महिलांची काळजी घेताना दिसत होत्या.सकाळच्या नाष्टापासून ते राञीच्या जेवणापर्यत अगदी बारकाईने महिलांची काळजी घेतली जात होती.जेवण वाढण्याचा कार्य दोघे मिळून करत होते. यामागे राजाभाई व रसिकाताईचा उदिष्ट इतकाच होता की एकही महिला जेवणा पासुन वंचित राहू नये. म्हणुन स्वता सगळया महिला जेवल्यानंतर ते जेवत होते.या सहलीला १७ वर्ष पुर्ण झाली. यापुर्वी ज्येष्ठ नागरिकांची वर्षा सहल काढण्यात येत होती. परंतु रसिकाताईच्या कल्पनेतून साकारलेली महिलांची सहल यांला ३ वर्ष पुर्ण झाली. महिलावर्ग कामामुळे कुठेही जात नाहीत म्हणुन महिलांना या सहलींचा लाभलेल्या घेता यावा म्हणून ताईने ठरवलं दरवर्षी पेक्षा या वर्षाची सहल अविस्मरणीय ठरली.आणि राजाभाईने महिलांना ग्वाही दिली की दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी पुढील उन्हाळी सहल अयाेध्या येथे नेण्यात येणार आहे. तरी आपला सहकार्य सहवास आणि प्रेम शेवटपर्यत असाच राहावा. आपली माणसं हीच आपली संपत्ती ते सुध्दा एका गरिब कुंटूबातील असल्यामुळे सर्वसामान्याची मन ओळखतात.अशी ग्वाही रसिका ताईने दिली हा जनतेचा राजा आहे.आणि जनतेवर यांच खुप प्रेम आहे अशी संकल्पना समारोपाच्या वेळी स्पष्ट केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]