माती परीक्षण व पाणी परीक्षण कार्यक्रमात ४३ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी
ठाणे (भिवंडी) :- दि.२१(आ. मा. टॉ. टे. न्यू ) ग्रामीण भागातील शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि जलव्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने B.N.N. College, Bhiwandi येथील ग्रामीण विकास विभाग व प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “माती परीक्षण आणि पाणी परीक्षण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शशिकांत म्हाळुंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी माती व पाणी ही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांचे 
शास्त्रीय परीक्षण व योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमात मा. प्रा. डॉ. दिलीप काकवीपुरे, विभाग प्रमुख, मा. डॉ. गुलिस्ता रईस अन्सारी आणि मा. डॉ. तेजाली आयरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माती परीक्षणाचे महत्त्व, मातीतील पोषक घटक, संतुलित खतांचा वापर, मृदा आरोग्य तसेच पाण्याची गुणवत्ता आणि जलव्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण विकास विषयाच्या ४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपल्या शेतातून मातीचे नमुने आणून परीक्षणासाठी सादर केले. यामुळे विद्यार्थ्यांना माती परीक्षणाची प्रत्यक्ष प्रक्रिया समजून 
घेण्याची तसेच आपल्या शेतातील मातीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला व माती व पाणी परीक्षणासंदर्भात विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाश्वत शेती, मृदा संवर्धन, संतुलित खत व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.ग्रामीण विकास विषयाच्या अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष शेतीशी जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शेतातून आणलेले मातीचे नमुने हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास विषयाचे विभाग प्रमुख डॉ.निनाद विजय जाधव यांनी कार्यक्रमाची सूत्रसंचालन व रूपरेषा मांडली आणि त्यांचे सहाय्यक प्रा.विद्या गुरुनाथ कांबळे यांनी कार्यक्रमाच्या अंतिम आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













