भरतशेट गोगावले रायगडचे पालकमंत्री; गोरेगावात शिवसैनिकांचा जल्लोष
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड (गोरेगाव ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेट गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने गोरेगावमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.या जल्लोषात माजी
जिल्हाप्रमुख विजयराज खुळे, विभागप्रमुख जगदीश दोशी, मंगेश कदम, शहरप्रमुख रोहित रातवडकर, उपशहरप्रमुख कृष्णा महाडिक, सज्जाद गोडमे, नथुराम बामणोलकर, ग्रामपंचायत सदस्य भउर, युवा सेना शहरप्रमुख राज भाटिया, जय दोशी, युवा सेना उपविभागप्रमुख सुशील गावडे, शैलेश महाडिक, राकेश रातवडकर, मनीष रातवडकर बाळा म्हशेळकर, बाळा तांदळेकर, नितीन भोस्तेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













