तरुणांच्या पाठीशी आपण खंबीर पणे उभे राहणे काळाची गरज — डॉ. किशोर पाटील
प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा वळपाडा कैलासनगर येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न!
ठाणे (भिवंडी) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वळपाडा कैलासनगर येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. पावसाची रिमझिम सुरू असतानाही विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पोलीस पाटील डॉ. सुनंदा अशोक पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर 
दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक प्रभारी शिक्षिका विशाखा घाग यांनी केले. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी सर्वांना ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कोणताही कार्यक्रम असो, तो यशस्वी करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या तरुण वर्गाचे अभिनंदन व आभार. कळत-नकळत काही चुका होत असतात; त्या पदरात घालून संबंधितांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यायामशाळेचा आपल्या मुला-मुलींनी योग्य वेळ ठरवून उपयोग करावा, जेणेकरून त्यांचे 
आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.यावेळी नगरसेविका सौ. गीता विठोबा नाईक, माजी सदस्य संदीप पाटील, उद्योजक अरुण पाटील, महिला मंडळ अध्यक्षा सोनल पाटील तसेच अंगणवाडी सेविका सौ. वनिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक नाऊ पाटील, शाम पाटील, माजी सदस्य दीपक पाटील, भानुदास पाटील, अनिल पाटील, महिला मंडळाच्या सचिव अविता पाटील, सहशिक्षिका पुष्पा पाटील, अंगणवाडी सेविका वनिता पाटील यांच्यासह ग्रामस्थ, तरुण वर्ग तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी शिक्षिका विशाखा घाग, सहशिक्षिका पुष्पा पाटील, अंगणवाडी सेविका सौ. वनिता संजय पाटील तसेच आजी-माजी विद्यार्थी वर्गाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













