नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोणतीही मदत असो, सोन्या दादा मनापासून देतात” – तृप्ती देसाई; – आजचा महाराष्ट्र

कोणतीही मदत असो, सोन्या दादा मनापासून देतात” – तृप्ती देसाई;

प्रतिनिधी

माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याण न्यासचा शैक्षणिक मदत उपक्रम उत्साहात संपन्न!

भिवंडी :-  ( आ. मा. टॉ. टे. न्यू) :समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार तथा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष श्री.रूपेश लक्ष्मण म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘शैक्षणिक मदत उपक्रम’ बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत

अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, पांगारी (ता. महाबळेश्वर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या उपक्रमाअंतर्गत शाळेला संगणक, साऊंड सिस्टीम तसेच विद्यार्थ्यांना वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सोन्या काशीनाथ

पाटील यांनी सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते शाळेला संगणक, म्युझिक सिस्टीम आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला ‘बिग बॉस’ फेम तृप्ती देसाई आणि ‘बिग बॉस’ फेम संतोष चौधरी (दादुस) यांची

प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तृप्ती देसाई यांनी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत समाज कल्याण न्यासच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेत त्या म्हणाल्या, “कोणतीही मदत असो, सोन्या

दादा ती मनापासून करतात. समाजातील गरजूंसाठी ते सातत्याने कार्यरत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.”यावेळी संतोष चौधरी उर्फ दादुस यांनी आपल्या खास शैलीत कोळीगीते सादर करून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मनोरंजन केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, समाज कल्याण न्यासचे प्रदेश युवा अध्यक्ष प्रितेश सोन्या पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, महाबळेश्वर तालुका अध्यक्षा अश्विनी उंबरकर, उपतालुकाध्यक्ष शेखर भगत, टारझन अनंता पाटील, संदीप घाडगे, रोटरी क्लब पांचगणीचे अध्यक्ष आदित्य गोळे, रोटेरियन सागर भोसले, शिक्षिका वनिता कदम, माजी सरपंच जाणू पांगारे, संदीप पांगारे, पोलीस पाटील दिनकर पांगारे, मनीषा पांगारे, ग्रामपंचायत सदस्या मंगल पांगारे, प्रिया पांगारे, आशा सेविका पुष्पा पांगारे, अंगणवाडी सेविका प्रियांका पांगारे, मदतनीस प्रियांका पांगारे, नंदा पांगारे बचत गटाच्या सदस्या, क्लार्क बाजीराव आंब्राळे, शिपाई संतोष पांगारे, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पांगारे यांनी केले, तर जाणू पांगारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]