नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिग बॉस फेम तृप्ती देसाई व संतोष चौधरी (दादुस) यांची पांचगणी नगरपरिषदेला सदिच्छा भेट – आजचा महाराष्ट्र

बिग बॉस फेम तृप्ती देसाई व संतोष चौधरी (दादुस) यांची पांचगणी नगरपरिषदेला सदिच्छा भेट

प्रतिनिधी

महाबळेश्वर :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) : महाबळेश्वर तालुक्यातील पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद येथे बिग बॉस फेम सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई तसेच श्री. संतोष चौधरी (उर्फ दादुस) यांनी नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे यांची सदिच्छा भेट

घेतली.या भेटीदरम्यान पांचगणी शहराच्या विकासकामांबाबत तसेच सामाजिक उपक्रमांविषयी विविध विषयांवर मैत्रीपूर्ण चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला.यावेळी पांचगणी नगरपरिषदेच्या नगरसेविका सुप्रिया महेश माने, नगरसेवक शेखर कासुर्डे, नगरसेवक गणेश कासुर्डे तसेच समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या महाबळेश्वर तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी उंबरकर उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यवरांनी तृप्तीताई देसाई व श्री. संतोष चौधरी (दादुस) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सदिच्छा भेटीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]