जळोली येथे आ. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विद्यार्थी एक झाड उपक्रम! १४० वृक्षांचे वाटप….
प्रतिनिधी
जळोली :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या ४३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा आणि पंढरपूर मतदार संघात विविध उपक्रम साजरे करुन आबांचा वाढदिवस साजरा होत असताना….. जळोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शिळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री दत्तात्रय बापू 
नरसाळे यांच्या वतीने “एक विद्यार्थी एक झाड”हा उपक्रम राबवित १४० वृक्षांचे वाटप करत संवर्धन करण्यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यात आले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत आबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच जळोली गावच्या एन्ट्री पॉईंटवर दत्तात्रय बापू नरसाळे यांच्या सहकार्याने मोठ्या २० झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले.आणि त्या झाडांचे संगोपनासाठी विद्यार्थी आणि शिक्षक निश्चितच सहकार्य करतील असे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगत.वृक्षारोपन केल्याबद्दल धन्यवाद मानले.यावेळी जळोली येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये गणेश जाधव , रवींद्र आबा नरसाळे, शहाजी तात्या नरसाळे, रंगनाथ जाधव,गणपत नरसाळे, बाळासाहेब नरसाळे, सुभाष शिरसट, रावसाहेब गोड,किसन शिरसट, अतुल शिरसट, शंकर भायगुडे, रामचंद्र भायगुडे,पिंटू मदने, किसन नरसाळे, कांतीलाल नरसाळे, रोहन नरसाळे, शिवाजी महाडिक,बाबाराजे कोळेकर,संभाजी पाटील, शशिकांत खराडे ,सुनील तात्या नरसाळे,सविता नवगिरे, फुलन साठे ,उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक श्री जयवंत कापसे ,तर सुत्रसंचलन नागनाथ गायकवाड यांनी मानले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक सिध्देश्वर लोंढे , कैलास नरसाळे , देवकी कलढोणे -दुधाणे , आणि ज्ञानेश्वर दुधाणे आदी उपस्थित होते….
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













