समाजसेवक गिरीष किणी यांना मानद डॉक्टरेट जाहीर… सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल…
प्रतिनिधी
मुंबई :- सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत श्री.गिरीष अविनाश किणी मु.कोन,पो.गोवे,सोनाई कुंज, पिंपळास रोड, मुकादम आली तालुका. भिवंडी,जिल्हा.ठाणे.यांना ब्राझीलस्थित इन्स्टिट्यूटो टिओलॉजिको दे मिसाओ आ अल्टिमा ट्रोम्बेटा (ITMUT) या संस्थेकडून ‘डॉक्टर होनोरिस कॉसा’ (Honorary Doctorate in social- worker) ही मानद उपाधी जाहीर करण्यात आली आहे.संस्थेने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार, सामाजिक शैक्षणिक ,क्षेत्रातील कार्य आणि जागतिक स्तरावरील योगदानाची दखल घेत साओ पाउलो (ब्राझील) येथे या मानद उपाधीस मान्यता देण्यात आल्याचे प्रमाणपत्रात 
लवकरच देण्यात येणार असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष व रेक्टर जनरल रेव्ह. प्रा.डॉ. जॉर्ज डी जेसस फिडेलिस तसेच चान्सलर प्रा. डॉ. दिप्ती आर.भदोरिया यांनी दिली आहे. श्री.गिरीष अविनाश किणी यांना मानद डॉक्टरेट उपाधी जाहीर झाल्याबद्दल समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.श्री.सोन्या काशीनाथ पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













