लायन्स क्लब भिवंडी चा पदग्रहण सोहळा संपन्न!
प्रतिनिधी
ठाणे (कल्याण ) :- *शिवकल्याण राजा* या संकल्पनेवर आधारित शिवशाहीचा प्रत्यय आणणा-या शानदार सोहळ्यात शनिवार दि.२०जून २०२६ रोजी लायन वर्ष २०२६-२७ या वर्षासाठी नवनियुक्त पदाधिका-याचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.या विशेष महत्त्वाच्या कार्यक्रमाला Multiple Council Chairman, 
Past District Governor PMJF लायन मनिष लाडगे Installation Officer होते तर Past District Governor PMJF लायन कमलकिशोर हेडा सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक होते.विद्यमान अध्यक्ष लायन भालचंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात सन २०२६-२७ सालाकरीता प्रमुख नवनिर्वाचित पदाधिका-यांची यादी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.अध्यक्ष:लायन डॉ.प्रमोद मारूती पाटील सचिव:लायन ॲड.विलास भोईर खजिनदार :लायन सुधीर देशमुख, लायन स्वप्निल भेरे उपाध्यक्ष:लायन डॉ.सुप्रिया अरवारी, लायन भारती मराठे,लायन निलेश जयवंत.प्रशासक:लायन सुधीर देशमुखसदर कार्यक्रमास लायन्स क्लबचे जेष्ठ पदाधिकारी अॅड. प्रमोद पाटील , डॉ.गोपाल लाहोटी यांचेंसह अनेक सदस्यांची

उपस्थिती उल्लेखनीय होती.विशेष निमंत्रितांमध्ये सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास थळे,रोटरी क्लबचे जेष्ठ पदाधिकारी श्री दासभाई पटेल, डॉ.राजदेरकर,अनेक सामाजिक,शैक्षणिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक मान्यवर,आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन सुधीर देशमुख,लायन शितल देशमुख, लायन जयश्री पाटील,लायन रामचंद्र कदम ,लायन स्वाती कदम,लायन स्वाती कोकणी,लायन सुरेश कुलकर्णी, लायन दिपक लेले, लायन सुरेश परदेशी, लायन स्नेहा कुलकर्णी यांच्या सह अनेक सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मावळते अध्यक्ष लायन रामचंद्र कदम यांनी केले तर सेक्रेटरी लायन विलास 
भोईर यांनी मागील वर्षीचा कार्यअहवाल सादर केला.नवनिर्वाचित अध्यक्ष लायन प्रमोद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात निर्वाचन समिती चे सभापती व लायन्स क्लब सदस्य,तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आप्तइष्टांच, मित्रपरिवार ,सहकारी व्यक्ती व संस्थांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त ककून आभार मानले व यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्याबरोबर लायन्स क्लब भिवंडी तर्फे मानवसेवेचे कार्य गरजू व तळागाळातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सांघिक प्रयत्न करून विद्यार्थी,महिला,जेष्ठ नागरिक व समाजातील सर्व घटकांसाठी सेवाभावी उपक्रम अधिक चांगले राबविले जातील याकामी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













