नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बामणोलीतील अनेक ग्रामस्थ भाजपात दाखल; संघटनात्मक ताकद वाढली – आजचा महाराष्ट्र

बामणोलीतील अनेक ग्रामस्थ भाजपात दाखल; संघटनात्मक ताकद वाढली

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड (माणगाव) :- माणगाव तालुक्यातील बामणोली गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे बामणोली परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, तालुका अध्यक्ष परेश सांगले, तालुका सरचिटणीस बाबुराव चव्हाण,

महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कासारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रचना थोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश खडतर यांच्यासह संतोष कळंबे, अमोल पवार, राजू तेडगुरे, समीर भक्कम, अनिल दांडेकर, संतोष महाराज पवार, समीर पवार आणि राजेश पवार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षप्रवेश सोहळ्यात श्री. साधू शिंदे, महेंद्र पवार, विठोबा पवार, हरी पवार, छाया मालोरे, सुरेश

मालोरे, राजाराम मालोरे, दीपक पवार, सहदेव पवार, राकेश पवार, सदाशिव पवार, विजय मालोरे, लहू पवार, संगीता पवार, रमेश पवार, विलास पवार, नामदेव पवार, दिनेश उभारे, लक्ष्मण शिंदे, संतोष उभारे, अनंत सुतार, अशोक सुतार, मंगेश सुतार, हनुमंत वाघलेकर, शेखर पवार, संतोष कडू, महादेव कडू, सतीश भालेकर, बाळाराम पवार, अक्षय पवार, सखाराम पवार, सचिन पवार, संभाजी पवार, दगडी भोईर, सुमित पवार, शिवाजी पवार, काळूराम पवार, बाबू मालोरे आणि कौस्तुभ पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्याने

पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. गावागावात आणि घराघरात पक्षाची विचारसरणी पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्धपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.”गावोगावी कमळ, घराघरात भाजपा” हा संदेश देत बामणोलीतील पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]