किशोर पाटील यांना सिव्हिल डिफेन्स बेसिक कोर्सचे प्रमाणपत्र आ.संजय केळकर यांच्या शुभहस्ते प्रदान!
प्रतिनिधी
ठाणे – कल्याण ) :- आ. मा. टॉ. टे. न्यू दि.२२.महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल डिफेन्स कॉर्प्सतर्फे आयोजित बेसिक प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डाॅ.श्री.किशोर बाळीराम पाटील यांना मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे तथा आमदार संजयजी केळकर यांच्या शुभहस्ते वाहतूक नियंत्रण कक्ष तीन हात नका एलबीएस मार्ग ठाणे पश्चिम येथील सभागृहात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.हा प्रशिक्षण कोर्स ५ जून २०२४ ते ९ जून २०२४ या कालावधीत कल्याण येथील ब्राइटन वर्ल्ड स्कूल येथे पार पडला. या प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.श्री.किशोर पाटील यांनी हा कोर्स पूर्ण करताना ‘सेकंड
क्लास’ श्रेणी मिळवली आहे. त्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र सिव्हिल डिफेन्स, ठाणे विभागामार्फत देण्यात आले असून, उपनियंत्रक विजय बी. जाधव आणि जिल्हाधिकारी तथा सिव्हिल डिफेन्स नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या स्वाक्षऱ्या प्रमाणपत्रावर आहेत.या यशाबद्दल स्थानिक पातळीवर त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी भविष्यातही आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी व्यासपीठावर उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे श्री.विजय .बी. जाधव ,श्री.अनिल गावीत (सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे),श्री.कमलेश श्रीवास्तव (उपायुक्त क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे),श्री.करमबिर सिंग भुर्जी (उपायुक्त क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे),डॉ.श्री.किशोर अढळकर (विभागीय क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे),डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी (नोडल ऑफिसर तथा विभागीय समादेशक), श्री.जितेंद्र सोनवणे (नोडल ऑफिसर जिल्हा समादेशक ठाणे)सुभाष गायकवाड (समादेशक कल्याण पूर्व) बाळा साठे (समादेशक ठाणे शहर)निलेश नरवडे (समादेशक भिवंडी शहर) आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी उपस्थित होते.हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे तथा आमदार संजयजी केळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल ऑफिसर तथा विभागीय समादेशक डॉ.श्री.मनीलाल शिंपी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी अधिकारी श्री संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन,सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे श्री.अनिल गावीत यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













