नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तुमची यशोगाथा ठरणार इतरांसाठी प्रेरणा – आजचा महाराष्ट्र

तुमची यशोगाथा ठरणार इतरांसाठी प्रेरणा

प्रतिनिधी

महिला सक्षमीकरण” मोहिमेत सहभागी होण्याचे कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे आवाहन

नवी मुंबई :- दि. १० ( आ.मा.टॉ.टे.न्यू.) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दि. ०९ एप्रिल, २०२६ पासून पुढील १५ दिवस ‘महिला सक्षमीकरण’ मोहिमेअंतर्गत व्यापक प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश केंद्र व राज्य शासनाच्या महिलाभिमुख योजनांची मा हिती तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ मिळवून देणे, हा आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील ज्या महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा (उदा. महिला बचत गट, कौशल्य विकास, अर्थसहाय्य योजना) लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध केले आहे, अशा महिला तसेच शासन सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला यांनी आपली माहिती, फोटो किंवा छोटे व्हिडिओ आपल्या जिल्हयातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभग यांनी केले आहे.अशा प्रकारे तुम्ही सहभागी होवू शकता विशेष प्रसिद्धी अभियानासाठी खालील बाबींची आवश्यकता आहे: यशकथा (Success Stories): योजनेचा लाभ घेवून तुम्ही सुरू केलेला व्यवसाय किंवा प्रगतीबद्दलची माहिती. UGC (युझर जनरेटेड कंटेंट): योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला फोटो किंवा योजनेच्या लाभासोबतचा सेल्फी (Selfie with Scheme) पाठवावा. व्हिडिओ बाईट्स: आपला अनुभव सांगणारा छोटा व्हिडिओ किंवा मुलाखत. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या ईमेल पत्त्यावर पाठवावे.या यशोगाथांना स्थानिक वृत्तपत्रे, आकाशवाणी, सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स), आणि डिजिटल ई-बुकलेटच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. स्थानिक इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातूनही या मोहिमेचा प्रचार करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील इच्छुक महिला लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व आपली माहिती देण्यासाठी आपापल्या जिल्हा माहिती कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. विभागीय माहिती कार्यायल,कोंकण भवन,नवी मुंबई ई-मेल आयडी-ddikon12@gmail.com, प्रविण डोंगरदिवे-मो. 869309666,जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे – ई-मेल आयडी- diothane2013@gmail.com, अविनाश सकपाळ- मो. 8369707572 ,जिल्हा माहिती कार्यालय, पालघर – ई-मेल आयडी- diopalghar@gmail.com, राम गोंदके, मो. 7021156414 ,जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- ई-मेल आयडी- dioraigad@gmail.com, विठ्ठल बेंदुगडे- मो. 9527436759 ,जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी- ई-मेल आयडी- ratnagiridio@gmail.com, योगेश मोडसिंग- मो. 9021636913 ,महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि इतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागीय उपसंचालक मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]