भिवंडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पोलीस दलाच्यावतीने पारितोषिक..
प्रतिनिधी
ठाणे ( भिवंडी ) :- ( आ.मा.टॉ.टे.न्यू ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करताना पोलिसांनी दिलेले नियम वसुचनांचे उत्सव मंडळांनी पालन करणे आवश्यक आहे.मिरवणुकीत सामिल होणारी वाहन सुसज्ज असावीत, बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्श शिकवण लक्षात घेऊनच उत्सवात देखावे सादर करावे, मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे गालबोट लागेल असे कृत्य कोणी करू नये सर्वानी नियमांचे पालन करावे असे आवाहन ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले.भिवंडीत सन २०२५ मध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या 
उत्साहात संपन्न झाला, उत्सव प्रसंगी शिस्तबद्ध मिरवणूक व सर्वोत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांना ठाणे पोलिस आयुक्तलय अंतर्गत भिवंडी पोलीस परिमंडळ -.२ कार्यालय यांच्यावतीने पारितोषिक देण्याचा कार्यक्रम बुधवार सायंकाळी भिवंडीतील ओसवाल महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख,पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे,मनपाचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे,अशोक होनमाने यांच्या सह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मान्यवर नागरीक,उपस्थित होते.भिवंडीत सर्व धर्माचे लोक राहत असल्याने सर्वच धार्मिक सण येथे मोठ्या उत्साहात साजरे होत ही आनंदाची बाब असुन सर्वानी पोलीस सुचनांचे पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले.यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळ खोनी गांव,(प्रथम पारितोषिक)रत्नदीप मित्र मंडळ (विशेष उल्लेखनीय पारितोषिक)समता सामाजिक संस्था मित्र मंडळ राहुल नगर कामतघर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ नवजीवन काँलनी पद्मानगर (व्दितीय पारितोषिक)सविधान मित्रमंडळ ब्रह्मानंद नगर व समता नगर मित्र मंडळ कोंबडपाडा (तृतीय पारितोषिक)बौद्धजन पंचायत समिती उत्सव मंडळ गायत्री नगर (सुंदर सजावट पारितोषिक) उत्तेजनार्थ पारितोषिकसम्राट मित्र मंडळ वराळदेवी नगर, डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, उत्सव मंडळ फुलेनगर १भिवंडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ श्रमिक नगर,गौतम नगर मित्र मंडळ कोंबडपाडा, प्रज्ञाशिल संघर्ष मित्र मंडळ कशेळी,धम्मचक्र बौद्ध विहार संघ मित्र मंडळ कोंडाजी वाडी, भिवंडी एसटी स्टँड आगार, सिद्धार्थ नगर मित्र मंडळ कोंनगाव,साई प्रसन्न सोसायटी मित्र मंडळ नारपोली,भिमसेना मित्र मंडळ खारबाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळ भैय्यासाहेब आंबेडकर नगर पटेल कंपाऊंड भिवंडी या विविध सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक पाहुण्यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.तसेच यावेळी उत्सव मंडळांनी सादर केलेल्या देखाव्याचे निरीक्षण करणारे समिती सदस्य जगदीशकुमार पाठारे, कृष्णगोपाल सिंह ठाकुर,मधुकर गायकवाड,जेष्ठ पत्रकार शरद भसाळे, ऍड.नियाज मोमीन,लतीफ शेख,श्रीराम पाटील, सुमित्र कांबळे यांना उपस्थित पाहुण्यांचे हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम सूत्रसंचालन मानसी राजे तर आभार प्रदर्शन एसीपी विजय मराठे यांनी केले यावेळी उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













