नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , “सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून पाहाणी “ – आजचा महाराष्ट्र

“सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून पाहाणी “

प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, सनदी अधिकारी, सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब (IAS) यांनी शनिवार दि. ४/४/२०२६ रोजी सकळी ठिक १०.३० वाजता आमच्या फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय, आनंद भवनला भेट देऊन, संपूर्ण इमारतीची पाहाणी केली. यावेळी आमच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सचिव डॉ. वासूदेव गाडे, प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व सिद्धशक्ती मासिकाचे संपादक आयु.

चंद्रशेखर कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्यासोबत उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, डॉ. देविका सुर्यवंशी, प्रा. संजयकुमार बोरसे व डॉ. शशिकांत मुंडेसह‌ ईतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.ब्रिटिशांच्या काळात १०० वर्षांपूर्वी लोखंड व सागाच्या लाकडाचे स्टक्चर असलेल्या महाविद्यालयाच्या हेरिटेज इमारतीच्या नुतनीकरणसाठी शासनाकडून अलिकडेच ४२ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे व लवकरच PWD विभागामार्फत काम सुरू केले जाणार आहे. त्या अनुषंगाने हर्षदीप कांबळे साहेबांनी सदर भेट त्यांचे अधिकारी व वास्तूविशारद यांच्या समवेत नियोजित केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी असलेले आयु. हर्षदीप कांबळे साहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची नवीन वास्तू आधुनिक शिक्षण पद्धतीला आवश्यक अशा सर्व पायाभूत सूविधांनी सुसज्ज अशी बनवली जावी अशी भावना इमारतीचे अत्यंत बारकाईने पाहणी करताना व्यक्त केली. त्यानंतर त्याच्यासमोर प्रस्तावित नुतनीकरणाचा आराखडा शासनाच्या वास्तुविशारदांनी सादर केला, त्यात त्यांनी अनेक चांगले बदल करण्याच्या सुचना त्यांच्या अधिकाऱ्यांना केल्या.तसेच आमच्या पिईएसचे विश्र्वत- सचिव डॉ. वासूदेव गाडे साहेबांनी देखील नविन शैक्षणिक धोरणांना प्रमाणे लागू केलेला अभ्यासक्रम विचारात घेऊन व त्यानुसार विद्यार्थी, शिक्षकाच्या गरजेनुसार, तसेच कॉलेजला निरंतर मेन्टनंसचा खर्च सस्टेन करता येईल, अशा स्वरूपाचे नुतनीकरण व्हावे अशी महत्वपूर्ण सुचना मांडली व त्याला प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित शिक्षकांनी दुजोरा दिला.इमारतीच्या पाहाणी दरम्यान कांबळे साहेबांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आवर्जून भेट दिली, त्यावेळी तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या आराम खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला‌ अत्यंत आदराने नतमस्तक झाले व त्यांनी व्यक्तिगत तसेच आमच्या शिक्षकांसोबत तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत फोटो काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंपैकी त्यांच्या जवळच्या परीचयाचा वरीष्ठ लिपीक राजू रोकडेसह‌ ईतर कर्मचाऱ्यांशी त्यांच्या जवळ जाऊन संवाद साधला व एकत्र फोटो काढला.-डॉ. विष्णु ज. भंडारे (प्रभारी प्राचार्य)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]