नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सह्याद्री प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून “तरुणांसाठी सुवर्णसंधी! विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे तीन दिवस आयोजन” – आजचा महाराष्ट्र

सह्याद्री प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून “तरुणांसाठी सुवर्णसंधी! विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे तीन दिवस आयोजन”

प्रतिनिधी

ठाणे ( भिवंडी) :- (आ.मा.टॉ.टे.न्यू.) नाट्यकलेची आवड असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सह्याद्री प्रबोधन संस्था भिवंडी यांच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी कै.मारूती पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा २३,२४ आणि २५ एप्रिल २०२६ रोजी दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धर्मवीर आनंद दिघे साहेब सभागृह, हरिधरा कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, रेल्वे स्टेशन रोड, अंजुरफाटा, भिवंडी येथे आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत नाट्य अभिनयाची मूलतत्त्वे, संवादफेक, रंगमंचावरील वावर, वाचिक अभिनय, तसेच प्रकाशयोजना व इतर तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्राविषयी प्राथमिक माहिती, ऑडिशनची तयारी आणि कॅमेऱ्यासमोर कसे सादर व्हावे याचेही प्रशिक्षण दिले जाईल.१५ वर्षांवरील इच्छुकांसाठी ही कार्यशाळा खुली असून प्रवेश मर्यादित आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी डॉ.श्री. प्रमोद मारूती पाटील (मो. 9970808292) व गंगाधर गुजराथी (मो. 8169682592) यांच्याशी संपर्क साधावा.नाट्यकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा तरुणांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त तरुणांना केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]