नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भिवंडीतील अनन्या म्हात्रे हिला ‘हिरकणी पुरस्कार’ नाशिक येथे प्रदान ! – आजचा महाराष्ट्र

भिवंडीतील अनन्या म्हात्रे हिला ‘हिरकणी पुरस्कार’ नाशिक येथे प्रदान !

प्रतिनिधी

नाशिक :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी श्री. आनंद अहिरे संचलित पुष्परत्न बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने कला, क्रीडा, नाट्य, शिक्षण, समाजकारण, शेती आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नावलौकिक मिळवलेल्या महाराष्ट्रातील ५५ महिलांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ. सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), सौ. सरोज

जगताप (शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक), श्री. वासुदेव देसले (पोलीस उपनिरीक्षक, नाशिक), श्री. मच्छिंद्र मुंडे (उद्योजक, सातारा) तसेच सौ. सुवर्णा भावसार (उद्योजक, भिवंडी) उपस्थित होते.यावेळी भिवंडी येथील कु. अनन्या सदानंद म्हात्रे हिला टी.व्ही. बालकलाकार कु.साऊ व आयोजक श्री. आनंद अहिरे यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी सोबत कु.संस्कृती सदानंद म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होती.या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]